• Sat. Sep 21st, 2024

सासवांचे दिवस गेले, आता सुनांचे दिवस पण तुम्ही घड्याळ दाबलं तर… अजित पवारांची फटकेबाजी

सासवांचे दिवस गेले, आता सुनांचे दिवस पण तुम्ही घड्याळ दाबलं तर… अजित पवारांची फटकेबाजी

इंदापूर: प्रत्येकाचा काळ असतो…चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनेचे येतातच. का नाही येत…? आता चार दिवस सासवांचे गेले आहेत. आता सुनांचे दिवस आले आहेत.. अर्थात तुम्ही बटन दाबलं तर…असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात त्यांनी असं वक्तव्य केलं आहे.
शरद पवारांना मिळाली तुतारी, बघू गावागावात किती ऐकणार म्हातारी, शायराना अंदाजात आठवलेंची टीका
अजित पवारांनी वक्तव्य केल्यानंतर एका कार्यकर्त्याने बटन काळं निळं होणार, अशी ग्वाही दिली. यावर पवार म्हणाले की, एवढं नको दाबू हळूच दाब, कुठेही दाबताना कोणालाही काळं निळं करू नको. आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते. मला बोलायला मर्यादा आहेत. पुढं कार्ट बसलयं मागे बायको आहे. हे दोघे नसते तर तुम्हाला सांगितलं असतं, असं गमंतीने म्हणतात एकच हशा पिकला.चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता, याची चर्चा उपस्थितांमध्ये होत होती. पुढे बोलताना पवार म्हणाले की, कोणी फोन करतील. कुणाला काही आठवणी येतील. कुणी जुन्या गोष्टींना उजाळा देतील. त्या सगळ्या गोष्टी किती समजून घ्यायच्या हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र कोणी बनवायचा प्रयत्न करत असेल तर त्याला बळी पडू नका. आपल्या सर्वांवर टीका होईल. विरोधी पक्षाकडून डिवचण्याचा प्रयत्न होईल. फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. पुढचे दोन महिने काम करण्याचे आवाहनही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले.

मनोज जरांगेंच्या आदेशावर मराठा समाज पुन्हा रस्त्यावर, धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

पुन्हा एकदा आपल्या विचारांचा खासदार निवडून देऊन केंद्रात आपल्या विचाराचे सरकार आणायचे आहे. राज्यातील कामे केंद्राकडून मंजूर करेल, अशी खात्री यावेळी पवार यांनी दिली. आपली कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी कुठेही कमी पडणार नाहीत. हा विश्वास मी सर्वांना देतो. मात्र लोकसभेच्या मतदानादिवशी घड्याळाचे बटन दाबायचं, असे आवाहनही पवार यांनी केले. इंदापूर येथील आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पुत्र जय पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र जय पवार हे व्यासपीठावर न बसता ते कार्यकर्त्यांसोबत व्यासपीठासमोर बसले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed