• Sat. Sep 21st, 2024

विदर्भात गारपीटीची शक्यता, नागपूरला ऑरेंज अलर्ट, राज्यात वादळी पावसाचा अंदाज

विदर्भात गारपीटीची शक्यता, नागपूरला ऑरेंज अलर्ट, राज्यात वादळी पावसाचा अंदाज

नागपूर: यंदा हिवाळ्यात थंडीपेक्षा पावसाच्या दिवसांमध्ये वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसाची हजेरी लागल्यानंतर आता महिना अखेरीस परत एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी तर शहरात वादळी पावसाचा अंदाज असून गारपीटीचीही शक्यता आहे. नागपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुढं कार्ट बसलंय आणि मागे बायको, दोघे नसते तर तुम्हाला सांगितलं असतं काय दाबायचं… अजित पवार सुस्साटयंदा थंडी फारशी जाणवलीच नाही. तरीसुद्धा जानेवारी अखेरीस थोडाफार गारठा होता. या काळात ८.७ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. हा या मोसमातील नीचांक होता. मात्र, त्यानंतर परत एकदा तापमान सामान्य झाले. आता त्यात वाढही होऊ लागली आहे. मध्यंतरी पावसाळी तसेच ढगाळ निर्माण वातावरण झाल्यानेसुद्धा तापमानात वाढ झाली आहे. आता २६ व २५ फेब्रुवारी रोजी परत एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बारामती लोकसभेत नणंद-भावजय लढत; सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, मतदारसंघात दौरे वाढले

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. शहर आणि विदर्भात जोराचा वारा सुटण्याचीही शक्यता आहे. शहरात ३० ते ४० किलोमीटर प्रती तास या वेगाने वारे वाहू शकतात. सध्या कमाल तापमान हे सरासरीपेक्षा दीड तर किमान तापमान हे सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे. तरीसुद्धा वादळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात थंडीत अचानक वाढ होऊन पारा सरीसरीपेक्षा २ ते ४ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed