अंतरवाली सरटीत मराठा समाजाची निर्णायक बैठक
तरवाली सराटीत मराठा समाजाची आज बैठक होणार आहे. दुपारी 1 वाजता जरांगेंनी निर्णायक बैठक बोलावली आहे. या बैठकीत आरक्षणासंदर्भात पुढच्या रणनीतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आज १६वा दिवस असून, सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जरांगे ठाम आहेत. तसेच बारस्करांच्या आरोपांना जरांगे प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.