• Sat. Sep 21st, 2024

मी वाघाची शिकार केली, त्याचा दात काढून गळ्यात घातला! एकनाथ शिंदेचा आमदार पुन्हा वादात

मी वाघाची शिकार केली, त्याचा दात काढून गळ्यात घातला! एकनाथ शिंदेचा आमदार पुन्हा वादात

बुलढाणा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारानं धक्कादायक कबुली दिली आहे. ८० च्या दशकात आपण वाघाची शिकार केली होती. त्याचा दात मी गळ्यात घालतो, असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनानं गायकवाड यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले संजय गायकवाड यांच्या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. सोमवारी बुलढाण्यात शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात गायकवाड सहभागी झाले होते. पारंपारिक वेशभूषेत त्यांनी सोहळ्याला हजेरी लावली. त्यांनी डोक्यावर फेटा, गळ्यात मोतांच्या, रुद्राक्षांच्या माळा घातल्या होत्या. आपल्या विधानांनी सातत्यानं चर्चेत राहणाऱ्या गायकवाड यांनी शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात धक्कादायक कबुली दिली.
तुम्ही निर्णय घेत नाही! नारायण राणे बाळासाहेबांना म्हणाले न् जोशींचं राजीनामापत्र टाईप झालं!
शिवजयंती सोहळ्यात गायकवाड यांना एका व्यक्तीनं त्यांच्या गळ्यात असलेल्या वाघनखाबद्दल विचारलं. त्यावर ते वाघनखं नसून वाघाचा दात असल्याचं गायकवाड म्हणाले. ‘१९८७ मध्ये मी वाघाची शिकार केली होती. त्याचा दात मी काढला होता,’ असं गायकवाड यांनी सांगितलं. त्यावर प्रश्नकर्त्यानं वाघ होता की बिबट्या, असा सवाल केला. त्यावर वाघ असं म्हणत बिबट्या तर मी असंच पळवून लावायचो, असं उत्तर गायकवाड यांनी दिलं.

गायकवाड यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. भारतात वाघाची शिकार करणं कायदेशीर गुन्हा आहे. असं असताना गायकवाड यांनी स्वत:च वाघाची शिकार केल्याची कबुली दिली आहे. या कबुलीमुळे ते अडचणीत सापडू शकतात. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
लोकसभेला पराभव, मतदारसंघात बॅनर, हातून गेलेलं दादर; जोशी सर न् मातोश्रीतला दुरावा कसा वाढला?
फडणवीसांच्या तोंडात करोनाचे जंतू कोंबण्याची भाषा
मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते इतका तिरस्कार त्यांच्याबद्दल माझ्या मनात निर्माण झाला आहे, असं विधान एप्रिल २०२१ मध्ये गायकवाड यांनी केलं होतं. करोना संकट काळात राज्यातील ठाकरे सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यावरुन गायकवाड यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मात्र टीका करताना त्यांनी पातळी सोडली. गायकवाड सध्या शिंदे गटात सुरू असून फडणवीस यांच्यासोबत ते सत्तेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed