श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस म्हणजे सातारा जिल्ह्याला पर्वणीच असते. अशा या दिलदार नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून लगबग सुरू आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलकांनी माहोल बदलून गेला आहे. त्यानिमित्त त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
साताऱ्यातील गांधी मैदानावर उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने “उदयनराजे श्री” भव्य शरीर सौष्ठव २०२४ स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मुळशी पॅटर्न फेम पिट्या अर्थात अभिनेता रमेश परदेशी व गायक उत्कर्ष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे श्री २०२४ शरीरसौष्ठव स्पर्धेत स्टाईल
उदयनराजेंची दमदार एन्ट्री झाली. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. स्टेजवर आल्यानंतर अभिनेते पिट्या भाईच्या आग्रहास्तव डायलॉगवर खा. उदयनराजेंनी कॉलर उडवत चाहत्यांची पुन्हा मने जिंकली. यावेळी चाहत्यांचा जोश घोषणा, शिट्ट्यांच्या माध्यमातून व्यक्त होत होता. यावेळी गायक उत्कर्ष शिंदे यांनी राजांचे गाणे गायले.
यावेळी शरीरसौष्ठव स्पर्धेबाबत तरुणांना मार्गदर्शन करताना उदयनराजे भोसले म्हणाले, युक्ती आणि शक्ती यांची जोपर्यंत सांगड घालत नाही, तोपर्यंत कोणी उंचीवर पोहोचत नाही. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी शरीर संपदा चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. परिश्रम घेतल्याशिवाय जगात कोणतीच गोष्ट आपल्याला साध्य करता येत नाही.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
या कार्यक्रमाला पिट्या भाई आणि उत्कर्ष शिंदे हे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो. मी नेहमीच विचार करतो, की वाढदिवस साजरा का करतो. एक वर्षाने वय कमी होत असतं, तर वाढदिवस साजरा केला असता तर मी समजू शकलो असतो. तरीदेखील सर्वांना शुभेच्छा! जीवनामध्ये मी एकच सांगतो. आपल्या सर्वांच्या सेवेस हजर आहे. ज्या-ज्या वेळी काही अडचण असेल तेव्हा दुसरे कोणी नसले तरी मी सोबत असणार आहे, असे सांगून उदयनराजे यांनी तरुणांच्या हृदयाला हात घातला.