• Sat. Sep 21st, 2024

मनोहर जोशींनी स्वत:च्या लग्नात दिलेला हुंडा, नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या किस्सा

मनोहर जोशींनी स्वत:च्या लग्नात दिलेला हुंडा, नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या किस्सा

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तींयामध्ये मनोहर जोशी यांचा समावेश होत असे. अत्यंत्य सामान्य परिस्थितीतून संघर्ष करत जोशी सरांनी शिवसैनिक ते महाराष्ट्राचा प्रमुख असा प्रवास केला. याप्रवासात त्यांना पत्नी अनघाताई जोशी यांची साथ लाभली. पण मनोहर जोशी यांनी लग्नावेळी ती एक शक्कल लढविली नसती तर कदाचित त्यांचे लग्न अनघाताईंशी झाले नसते

नेमकं काय घडलेलं?

मनोहर जोशी यांनी सुरुवातीच्या काळात म्हणजेच शिवसेनेत येण्याआधी बराच संघर्ष करावा लागला. मनोहर जोशी यांचे रायगडमधील नांदवी हे गाव. जोशींच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. लहानपणी मनोहर जोशी वडिलांसोबत भिक्षुकी मागण्याचे काम करत. पुढे शिक्षणासाठी जोशी मुंबईत आले. मोठ्या कष्टाने त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि मुंबई महापालिकेत कारकुनाची नोकरी धरली. थोडे दिवस नोकरी केल्यानंतर नोकरी सोडून जोशी यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला अन् मुंबईत क्लासेस सुरु केले. थोडं आर्थिदृष्ट्या स्थिर झाल्यानंतर जोशी यांच्यासाठी स्थळं शोधायला सुरुवात झाली. एका मध्यस्थाने पुण्यातील मंगल हिगवे यांचे स्थळ मनोहर जोशी यांच्यासाठी सुचवले. जोशी यांना मुलगी पसंत पडली. हिगवे यांचे मूळचे कुटुंब पुण्याचे. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने मंगल यांच्या एकुलत्या भावावर संपूर्ण कुटुंबाचा भार होता. एकूणच आर्थिक परिस्थिती हालाखीची होती.

निष्ठावान शिवसैनिक आपल्यातून जाणं हे दुर्दैवं, ठाकरेंकडून आठवणींना उजाळा, जोशींना श्रद्धांजली!


मुलगी पाहण्याचे सर्व सोपस्कर झाल्यानंतर जोशी कुटुंबीयांनी हुड्यांचा विषय काढला. परंतू आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने अनघा ताईंच्या कुटुंबियांना हुंडा देणे शक्य नव्हते. जोशी कुटुंबीयही हुंड्यावर अडून बसले होते. यावेळी मनोहर जोशी यांनी घरातील सदस्यांना माहिती न होऊ देता आपल्याकडील रक्कम अनघाताईंच्या भावाला दिली अन् ही रक्कम तुम्ही हुंडा म्हणून आमच्या कुटुंबाला द्या असे सांगितले. यानंतर अनघाताईंच्या भावाने मनोहर जोशींच्या लग्नासाठी हुंडा दिला अन् मनोहर जोशींचे लग्न पार पडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed