• Mon. Nov 25th, 2024

    घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, शेजारच्यांनी वाद घातला, रक्तरंजित शेवटानं परिसरात खळबळ

    घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, शेजारच्यांनी वाद घातला, रक्तरंजित शेवटानं परिसरात खळबळ

    नागपूर : नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या इंदिरा नगर परिसरात किरकोळ वादातून गुन्हेगार पिता-पुत्राने मिळून शेजारच्या तरुणावर चाकूने वार करून हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची फिर्याद मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
    तक्रार ऐकून न घेतल्याने तरुणाने पोलीस आयुक्तांची गाडी फोडली, घटनेत गाडीचं मोठं नुकसान
    नागपूर शहरात फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेली हत्येची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. बुधवारी रात्री इमामवाडा पोलीस ठाण्याच्या इंदिरा नगर जाटतरोडी परिसरात आणखी एका हत्येची घटना घडली. आरोपी शेरू उर्फ शंकर राठोड याने त्याचा मुलगा ऋतिकसह शेजारी राहणाऱ्या महेश बावणे नावाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. वडिलांच्या निधनानंतर मृतक महेशला अनुकंपा तत्त्वावर रेल्वेत नोकरी मिळाली होती. त्याच्या बायकोचा सातव्या महिन्याचा पाळण्याचा कार्यक्रम गुरुवारी होता. या कार्यक्रमामुळे त्यांच्या घरी परिसरातील लोकांची गर्दी झाली होती.शेजारी राहणाऱ्या महिलेने लॉकडाऊनच्या काळात आरोपी शेरू आणि शंकर राठोड यांच्याकडून व्याजाने काही पैसे घेतले होते. शंकर हा अवैध सावकारी करत असून त्याच्यावर यापूर्वी हत्या, प्राणघातक हल्ला असे गुन्हेही दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. शंकरकडून पैसे उधार घेतलेल्या महिलेची मुलगी मृतक महेशच्या घरी त्याच्या पत्नीला मेहंदी लावण्यासाठी आली होती. यावेळी शंकर दारूच्या नशेत मृतकाच्या घरी आला आणि त्याने मुलीला शिवीगाळ करत धमकावणे सुरू केले. मात्र, घरात पाहुणे असल्याचे कारण देत महेशने शंकरला शिवीगाळ करू नको, असे सांगितले.

    १० टक्के दिलेलं न टिकणारं, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं; आंतरवाली सराटीतील मराठा आंदोलक आक्रमक

    त्यानंतर शंकर त्याच्या घरी गेला आणि मुलगा हृतिकसह चाकू व रिव्हॉल्व्हर घेऊन महेशच्या घरी पोहोचला. जिथे हृतिकने महेशला मागून पकडले आणि वडील शंकर यांनी महेशला चाकूने भोसकून ठार केले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. महेशच्या कुटुंबीयांनी परिसरातील रहिवाशांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेले. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले. काही दिवसांपूर्वी मृतकच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतकाला त्यांच्या जागी रेल्वेत नोकरी लागली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सातव्या महिन्याचा पाळण्याचा आनंद शोकात बदलले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed