• Mon. Nov 25th, 2024
    तक्रार ऐकून न घेतल्याने तरुणाने पोलीस आयुक्तांची गाडी फोडली, घटनेत गाडीचं मोठं नुकसान

    छत्रपती संभाजीनगर: तक्रार घेऊन आलेल्या तरुणाची तक्रार न ऐकल्यामुळे संतप्त तरुणाने छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तांची गाडी फोडण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस आयुक्तालयात उभ्या असलेल्या गाडीवर वीट फेकून मारत तरुणाने गाडीची काच फोडली आहे. दरम्यान या घटनेमुळे पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली असून संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवार दी. २२ रोजी सायंकाळी घडली.
    मुख्याध्यापकासह शिक्षक दारु ढोसून शाळेत, पालकांनी जाब विचारत दिला चोप, व्हिडिओ व्हायरल
    याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी भागामध्ये राहणाऱ्या विशाल म्हस्के नाव असलेल्या एका तरुणाने स्वतःची तक्रार घेऊन छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय गाठलं. पोलीस ठाण्यात आपल्या तक्रारीचे निराकरण होत नसल्यामुळे तक्रार पोलीस आयुक्तांना देण्यासाठी हा तरुण आला होता. मात्र तक्रार घेऊन आलेल्या विशाल मस्के नावाच्या तरुणाला आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कुठलीच कारवाई न केल्यामुळे संतप्त तरुणाने बॅगमध्ये आणलेल्या वीट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या खाली उभी असलेल्या चारचाकी गाडीवर आणि प्रवेशद्वाराच्या काचेवर मारून काचा फोडल्या आहेत.

    या घटनेत गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तालयमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती देखील पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

    ताईला मत म्हणजे विकासाला मत; बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात

    याप्रकरणी पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर म्हणाले की, संबंधित करून हा मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक माहिती आहे. तो तक्रार घेऊन आला होता. मात्र खाली येताच त्यांनी आयुक्तांच्या गाडीवर आणि प्रवेशद्वारावर दगड मारला. संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *