• Mon. Nov 25th, 2024
    लेणी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, ८४ जणांवर प्राथमिक उपचार

    जुन्नर: जुन्नरला एकीकडे हिंदवी स्वराज्य महोत्सव सुरु असताना लेणी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर आगी मोहळाच्या मधमाशांनी हल्ला केला. तुळजा लेणी परिसरात ही घटना दुपारच्या सुमारास घडली. यामध्ये मधमाशा चावल्याने गर्भगळीत आणि जखमी झालेल्या अनेक पर्यटकांना उपचारासाठी जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागले. ८४ जणांवर प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. तर उलट्यांचा त्रास झालेल्या पाच जणांवर आणि एका पडून जखमी झालेल्या मुलावर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. योगेश आगम यांनी दिली.
    दारु पिल्यानंतर जोरदार वाद, घरात घुसून मित्राच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करत संपवलं
    मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर तसेच पिंपरी चिंचवड येथून आलेल्या पर्यटकांचा यामध्ये समावेश आहे. तुळजा लेण्या पाहण्यासाठी दोन बसमधून हे पर्यटक आले होते. लेणी पाहण्यास गेले असता अचानक मोहोळातील माशा उठल्या. त्यांनी पर्यटकांवर हल्ला चढवला. यामध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान याच लेणी परिसरात हिंदवी स्वराज्य महोत्सवाचा भाग म्हणून रॅपलिंगची प्रात्यक्षिके सुरु होती. मात्र ते त्यातून बचावले.

    दरम्यान हा प्रकार घडल्याने अनेक जण आरडाओरडा करत होते. त्यावेळी जुन्नर येथील क्रीडा शिक्षक सुनिल बढे यांनी जखमी झालेल्या पर्यटकांना अंगावर ओढणी, कपडे झाकून घेत बसण्यास सांगितले. तर लेणी परिसरात असलेल्या तुळजा मंदिरातील पुजाऱ्याची गादी त्यांनी बाहेर आणून पेटवली. या धुराने बहुतांश माशा निघून गेल्या. दरम्यान त्यांनीच जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य राजकुमार चव्हाण यांना ही घटना कळवली. त्यांनी लगेचच ग्रामीण रुग्णालयाला संपर्क साधून १०८ ॲम्बुलन्स आणि आणखी एक ॲम्बुलन्स तातडीने बोलावून जखमींना रुग्णालयात हलवले.

    मी गेल्यावरही लोकांनी तुझा सन्मान ठेवायला पाहिजे, सतेज पाटलांनी सांगितला विलासरावांसोबतचा किस्सा

    ॲम्बुलन्सच्या दोन ते तीन फेऱ्या करत जखमी पर्यटकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेस्क्यू टीमचे सदस्य अतिक सय्यद,अली सय्यद यांनी पर्यटकांना उपचारासाठी विशेष धावपळ केली. अनेकांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले आहे. दरम्यान उग्र सेंटमुळे माशा आल्याचे समोर आले आहे. दरम्यान काही जणांनी उग्र अत्तराचा सेंट मारलेला होता. त्याच्या वासाने आगी मोहळाच्या माशा उठल्या आणि त्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed