• Sat. Mar 7th, 2026
    पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट, पुणे-मिरज दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक

    पुणे : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वे मार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शनमध्ये रेल्वे ट्रॅक दुहेरीकरण आणि विविध अभियांत्रिकी, सिग्नालिंग दूरसंचार कामांसाठी दिनांक 22.02.2024 पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक चालवणार आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

    तपशील खालीलप्रमाणे आहे :-

    A. दिनांक 20.02.2024 रोजी प्रवास सुरु होणाऱ्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या
    1. गाडी क्रमांक 01024 कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस

    B. दिनांक 21.02.2024 रोजी प्रवास सुरु होणाऱ्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या
    1. गाडी क्रमांक 01024 कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस
    2. गाडी क्रमांक 01023 पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस

    C दिनांक 22.02.2024 रोजी प्रवास सुरु होणाऱ्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या
    1. गाडी क्र. 11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस
    2. गाडी क्र.11029 मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस

    D. दिनांक 23.02.2024 रोजी प्रवास सुरु होणारी रद्द करण्यात आलेली गाडी
    1. गाडी क्रमांक 01023 पुणे-कोल्हापूर एक्सप्रेस

    गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/शॉर्ट ओरिजिनेशन

    1. दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी सुटणारी डेमू क्रमांक 01542 कोल्हापूर-सातारा या गाडीचा प्रवास कराड येथे संपेल म्हणजेच ही गाडी कराड-सातारा दरम्यान रद्द राहील.

    2. दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी सुटणारी डेमू क्रमांक 01541 सातारा-कोल्हापूर चा प्रवास कराड येथून सुरू होईल म्हणजेच ही गाडी सातारा-कराड दरम्यान रद्द राहील.

    3. दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी सुटणारी गाडी क्रमांक 11425 पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसचा प्रवास सातारा येथे संपेल म्हणजेच ही गाडी सातारा-कोल्हापूर दरम्यान रद्द राहील.

    4. दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी सुटणारी गाडी क्रमांक 11426 कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस सातारा येथून पुणे करीता सोडण्यात येईल म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-सातारा दरम्यान रद्द राहील.

    5. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी गोंदिया येथून सुटणारी गाडी क्रमांक 11040 गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा प्रवास पुण्यात संपेल म्हणजेच ही गाडी पुणे-कोल्हापूर दरम्यान रद्द राहील.

    6. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रोजी कोल्हापूर येथून सुटणारी गाडी क्रमांक 11039 कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस पुणे येथून सुटेल म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-पुणे दरम्यान रद्द राहील.

    परिवर्तित मार्गावरून जाणाऱ्या गाड्या

    1. दिनांक 21.02.2024 रोजी हजरत निजामुद्दीन येथून सुटणारी गाडी क्रमांक12630 हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर एक्सप्रेस दौंड-कुर्डुवाडी-पंढरपूर-मिरज या वळवलेल्या मार्गाने धावेल आणि ही गाडी पुण्याला येणार नाही.
    2 दिनांक 21.02.2024 ला बेंगळुरूहून सुटणारी गाडी क्र. 16505 बेंगळुरू-जोधपूर एक्सप्रेस मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-दौंड-पुणे या वळवलेल्या मार्गावर धावेल आणि ही गाडी सांगली, कराड आणि सातारा येथे येणार नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed