• Mon. Nov 25th, 2024
    जनतेची आणि श्रीजयाची इच्छा असेल तर तिला भोकर मतदारसंघातून तयार करू – अमिता चव्हाण

    जालन्यात मराठा समाज आक्रमक, जालना अंबड महामार्ग रोखला, बैलगाड्यासह रस्त्यावर

    नांदेड: अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. प्रवेशाबाबत त्यांनी कोणत्याच नेत्यांशी किंवा कार्यकर्त्यांसोबत चर्चा देखील केली नाही. मात्र घरात चर्चा करूनच अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला, असं स्पष्टीकरण त्यांची पत्नी तथा माजी आमदार अमिता चव्हाण यांनी दिले. कैलासवासी शंकर राव चव्हाण आणि कुसमाताई चव्हाण स्मृतिपित्यर्थ नांदेडमध्ये शंकर दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान अमिता चव्हाण यांनी हे स्पष्टीकरण दिले.
    मोदींच्या त्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंना आला होता घाम, कोल्हापूरच्या अधिवेशनात CM शिंदेंनी सांगितला तो किस्सा
    कोणताही निर्णय घेताना आमच्या कुटुंबियात चर्चा होतं असते. भाजप पक्षातील प्रवेशाबाबत कुटुंबियात चर्चा झाल्याचे अमिता चव्हाण म्हणाल्या. जेव्हापासून अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली, तेव्हापासून आमच्या घरात या विषयावर चर्चा सुरु होती. आता या विषयाला पूर्णविराम मिळाला, अस मिश्किल उत्तर त्यांनी दिले आहे. साहेबांनी जो पण निर्णय घेतला आहे, तो त्यांच्या वैयक्तिक निर्णय आहे. नांदेडच्या विकासासाठी भाजपमध्ये गेल्याचे माजी आमदार अमिता चव्हाण यांनी सांगितले.

    अमिता चव्हाणांचे श्रीजयाच्या निवडणूक लढवण्याचे संकेत

    अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया ह्या निवडणूक लढणार, अशी चर्चा सुरु आहे. मागील काही महिन्यांपासून त्या राजकारणात सक्रिय देखील आहेत. अशोक चव्हाण हे आता राज्यसभेवर गेल्याने भोकर विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. तेव्हा श्रीजया चव्हाण ह्या भोकरमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत अमिता चव्हाण यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी भोकरच्या जनतेची आणि श्रीजयाची इच्छा असेल तर तिला भोकर मतदारसंघातून तयार करू, असं त्या म्हणल्या. लोकांची मत जाणून घेऊ, लोकांवर उमेदवार लादणार नाही, असं देखील अमिता चव्हाण म्हणाल्या.
    दरम्यान याबाबत लोकांची आणि साहेबांची इच्छा असेल तर लढू या असं उत्तर श्रीजया चव्हाण यांनी दिलं. श्रीजया चव्हाण ह्या अशोक चव्हाण यांच्या राजकीय वारसदार आहेत. अमिता चव्हाण यांनी संकेत दिल्याने भोकर विधानसभेतून श्रीजया चव्हाण ह्याच भाजपच्या उमेदवार राहणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *