• Mon. Nov 25th, 2024
    नांदेडमध्ये काँग्रेस आमदाराच्या वाहनावर हल्ला, काचा फोडल्या, मोहन हंबर्डे सुरक्षित

    नांदेड : जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे. त्यातच शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गावात कीर्तनाच्या कार्यक्रमाला आलेल्या नांदेड दक्षिणच्या काँग्रेस आमदाराच्या वाहनावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. नांदेड शहरालगत असलेल्या पुंड पिंपळगाव येथे ही घटना घडली. घटनेनंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेनंतर काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे हे सुरक्षित असल्याची माहिती आहे.

    नांदेड तालुक्यातील पुंड पिंपळगाव येथे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे हे रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गावात गेले होते. गावात प्रवेश करताच मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत त्यांचा विरोध केला.
    राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील; शाहांची सूचना, पवारांना धक्का
    त्यानंतर आंदोलककांशी चर्चा करण्यासाठी आमदार मोहन हंबर्डे हे वाहनातून बाहेर आले. काही वेळातच आंदोलकांनी दगडफेक करत त्यांच्या वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्या. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात आमदार मोहन हंबर्डे हे सुरक्षित असल्याची माहिती आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती.
    पुढचे मुख्यमंत्री कोण? फडणवीस म्हणाले, तिन्ही पक्ष ठरवतील; पण मोठा रोल भाजप नेतृत्वाचा

    हिंगोली सीमेवर रात्री चक्काजाम, महिलांचा मोठा सहभाग

    हिंगोली महामार्गावरील निळा रोड फाटा येथे मराठा आंदोलकांनी चक्का जाम सुरु केला. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील किमान दहा गावातील नागरिक इथे जमा झाले होते. सकाळपासून याठिकाणी आंदोलन सुरू होते. पण, आज रात्री दहा वाजता पुन्हा मराठा आंदोलकानी चक्का जाम सुरू केला.

    निलेश राणे दिसले अन् भास्कर जाधवांचा पाराच चढला

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    या आंदोलनात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा देण्यात आला. रात्री याच ठिकाणी मुक्काम आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *