पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद दिले आहे. मात्र यामुळे शिरुर लोकसभेच्या रिंगणातून आढळरावांना बाहेर तर काढले नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे शिरूर लोकसभेसाठी शिवसेनेकडून कोण उमेदवार असणार आणि आढळराव यांना म्हाडाचे अध्यक्ष पद देण्यामागे नेमकी रणनीती कुणाची आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. म्हाडाचे अध्यक्षपद आणि राज्यमंत्री पदाचा दर्जा आढळराव पाटील यांना देण्यात आल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यात आल्याची चर्चा आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत आपण ‘निष्ठावंत’ असल्याचे दाखवून दिले. सलग तीन टर्म त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र यंदाच्या निवडणुकीत देखील ते लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे.
मात्र, आता शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून बाहेर काढण्यासाठी म्हाडाचे अध्यक्षपद दिले असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. आढळराव यांना शिरूर लोकसभेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी तर नाही ना? आणि असल्यास महायुतीचा शिरूरचा उमेदवार कोण? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची घोडेस्वारी रोखण्यासाठी चंग बांधलाय. तसे जाहीर आव्हान अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिलंय. पण घड्याळाचा चिन्हावर उभं राहणारा आणि कोल्हेचा काटा काढणारा तो तुल्यबळ उमेदवार कोण असणार? याबाबत आता शिरूरचे राजकारण पुन्हा तापू लागले आहे.