• Mon. Nov 25th, 2024
    नारायण राणेंचं जरांगेंवरील वक्तव्य वादात, मराठा समाज आक्रमक, दिला ‘असा’ इशारा

    सोलापूर: भाजप नेते नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. सोलापुरातील मराठा बांधवानी नारायण राणेंचा तीव्र शब्दात विरोध करत निषेध केला आहे. सर्व मराठा बांधवानी एकत्रित येत गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शहरातील मरीआई चौकात नारायण राणेंचा विरोध केला.
    मनोज जरांगेंचे बरे वाईट झाल्यास भाजप औषधालाही शिल्लक ठेवणार नाही, मराठा स्वराज्य संघाचा इशारा
    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. दरम्यान नारायण राणे यांनी जरांगे पाटील यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभर राणे कुटुंबाचा विरोध केला जात आहे. राणे कुटुंबीयांचा कोंबडी चोर असा उल्लेख करत संतप्त मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी बोलताना राणे कुटुंबीयांनी तोंड सांभाळून बोलावे. त्यांना मराठा बांधव महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही, असा इशाराही दिला जात आहे.

    मी एकटा मुंबईत जाऊन बसेन, सलाईन लावायच्या आधी अंमलबजावणी कधी करता सांगा : मनोज जरांगे

    सोलापूर शहरातील मरीआई चौकात गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मराठा समाज बांधवानी एकत्रित येत नारायण राणेंचा जबरदस्त विरोध केला. नारायण राणेंचा भाजप वापर करून घेत आहे. आता राज्यसभेच तिकीट कापलं आहे. भविष्यात नारायण राणे हे ग्रामपंचायतीवर देखील निवडून येणार नाहीत, असा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला. सोलापुरातील मराठा समाज बांधवानी माऊली पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येत नारायण राणेंच्या पोस्टरला जोडे मारून निषेध केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed