• Mon. Nov 11th, 2024

    चुकीला माफी असते पण गुन्ह्याला नसते, लोखंडेंकडून शिवसेना चोरण्याचा गुन्हा : उद्धव ठाकरे

    चुकीला माफी असते पण गुन्ह्याला नसते, लोखंडेंकडून शिवसेना चोरण्याचा गुन्हा : उद्धव ठाकरे

    अहमदनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोपरगावमध्ये सुरु आहे. कोपरगावातील सभास्थळी उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिर्डीचे लोकसभा खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मतदारसंघात ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी हा कुटुंबसंवाद सोहळा असल्याचं म्हटलं आहे.

    भाजपला हे कळत नाही की एवढे प्रयत्न करुन सुद्धा उद्धव ठाकरेंना संपवता येत नाही. सर्व बाजूनं घेरलं, आमदारांना फोडलं, खासदारांना फोडलं. पण त्या खासदाराला माहिती नाही की तो गद्दार झाला तरी ज्यांनी निवडून दिले ते माझ्यासोबत राहिलेले आहेत. गद्दारांना गाळमिश्रीत पाणी पाजावं लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेसोबत मुस्लीम समाज आपल्यासोबत येत आहे. कोकणात, मराठवाड्यात गेलो होतो सगळीकडे मुस्लीम लोक तुमच्यासोबत आहोत, हे सांगत आहेत. शिवसेनेचं हिंदुत्व इतर धर्मीयांना देखील समजल्याचं कळल्याचं ठाकरेंनी म्हटलं.

    राज्यात फेब्रुवारी महिन्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. सोलापूरमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरु आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेत का? अवकाळीनं झालेल्या नुकसानाचे पैसे मिळालेत का? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना विचारलं. शिर्डीचा दौरा केला होता त्यावेळी शेतकऱ्यांनी निळवंडे धरणाचं पाणी मिळालं असतं तर पिकं वाचली असती, असं सांगितलं होतं. नरेंद्र मोदी काम पूर्ण झाल्यावर उद्घाटन करायला येतील, असं ठाकरे म्हणाले.

    मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यासाठी नरेंद्र मोदी येणार असल्याच्या चर्चा आहेत. नरेंद्र मोदी यांना उद्धव गॅरंटीचं उद्घाटन करण्याची वेळ येतेय ही मोठी गोष्ट आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना हे नाव लागल्यानं सदाशिव लोखंडेंना दोनवेळा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकांनी मतदान केलं. भाऊसाहेब वाकचौरे पक्षातून बाहेर पडले होते पण त्यांनी शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केला, असं ठाकरे म्हणाले.
    राज्यात गुंडागर्दी सुरू, मुंबई अदानींच्या शिखात घालण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

    भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांच्या डोक्यावर उपरे बसवले, अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरेंचा हल्लाबोल

    गुन्ह्याला माफी नसते…

    एकवेळ चुकीला माफी असते पण गुन्ह्याला माफी नसते.हे गुन्हेगार आहेत, भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केलाय त्यांना कोणत्याही परिस्थितीत गाडलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील गद्दारी झाली होती. भगव्यासोबत अनेकांनी गद्दारी केली तरी तो हजारो वर्ष फडकत राहणार आहे, असं ठाकरे म्हणाले.
    राज्य सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लावा, ताबडतोब निवडणूक घ्या, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

    देशात हुकूमशाही विरुद्ध घराणेशाही असा लढा होणार आहे. मी प्रबोधनकारांचा नातू आणि शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. तुमच्याकडे अशोकराव चव्हाण आलेत ती घराणेशाही नाही का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांना सोबत घेता, काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्यांना सोबत घेता आणि घराणेशाहीवर बोलता, असा सवाल ठाकरेंनी केला.
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    आज शेतकऱ्यांची घरं उद्धवस्त होत आहेत. पीक विमा मिळत नाही, हमीभाव मिळत नाही अशी स्थिती आहे. स्वामिनाथन यांना भारतरत्न जाहीर केला पण स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी का लागू करत नाही, असा सवाल ठाकरेंनी केला. हमीभावासाठी शेतकरी दिल्लीकडे जात आहेत. शेतकरी दिल्लीत येऊ नयेत म्हणून तारांची कुंपणं टाकलेली आहेत.जे जवान भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहेत. त्यांना अन्नदात्यासमोर उभं करता. पोलीस अन् सैनिक ही शेतकऱ्यांची मुलं आहेत, असं ठाकरे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed