• Sat. Sep 21st, 2024

२० ते २२ आमदारांना मी स्वत: बोललो मात्र… अशोकरावांच्या राजीनाम्यावर बंटी पाटील काय म्हणाले?

२० ते २२ आमदारांना मी स्वत: बोललो मात्र… अशोकरावांच्या राजीनाम्यावर बंटी पाटील काय म्हणाले?

कोल्हापूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राज्याची जाण असणाऱ्या मोठ्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या अशोक चव्हाण यांनी उचललेल्या या पावलामुळे काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून अशोक चव्हाण यांनी घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे. मात्र यापुढे राज्य आणि देशातील तरुणाई काँग्रेसचा झेंडा पुढे घेऊन जात काँग्रेस एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसचे आमदार भाजप सोबत जाणार यात तथ्य नाही
आज दुपारच्या सुमारास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा राजीनामा दिला. यामुळे आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस मध्ये देखील राजकीय भूकंप झाला आहे. यामुळे काँग्रेस मधील आणखी काही नेते भाजपच्या गळाला लागतील का असे चर्चा राज्य सुरू आहे. मात्र मी सकाळपासून २० ते २२ आमदारांशी बोललो आहे. राज्यातील कोणतेही काँग्रेस आमदार भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नाही. यामुळे सुरू असलेल्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. राज्यात काँग्रेसला चांगलं वातावरण असल्याने आपण एकत्र येऊन लढू असं आमदारांचे म्हणणे असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
कालपर्यंत सोबत होते, आज भाजपवासी, विश्वास बसत नाही, अशोकरावांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांचं ट्विट

तसेच काँग्रेसला जास्त जागा मिळतील असा सर्व्हे आला. त्यामुळे कुठतरी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. आम्ही एकत्र राहिल्यानंतर महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार असल्याने महायुतीचा कारभार लोकांना आवडलेला नाही हे सर्व्हेतून समोर आल आहे. राज्याच्या जनतेचा मूड महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. अशोक चव्हाण जरी गेले असले तरी दुसऱ्या फळीतील आम्ही कार्यकर्ते हा झेंडा समर्थपणे पुढे घेऊन जाणार आहोत, असंही सतेज पाटील यांनी सांगितलं.

जनता महाविकास आघाडीला कौल देईल
राज्यातील जनतेचा कल पाहता या सगळ्या घटना घडल्यानंतर कोणत्याच निवडणुका झाल्या नाहीत, नागरिक निवडणुकीत आम्हाला कौल देतील आता काँग्रेस म्हणून आम्ही एकसंध राहणार आहोत. शिवसेना उद्धव ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उर्वरित काँग्रेसला जनतेचा कौल देईल असा ठाम विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed