• Wed. Mar 11th, 2026
    कारमधून उतरले, तोंडाला रुमाल, पाच जणांच्या हातात बंदुका; माजी नगरसवेकावर गोळीबार

    निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माजी माजी नगरसेवकावर पाच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. ही घटना घडल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर गोळीबार करुन जीवघेणा हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील देवरे हॉस्पिटलसमोर आज बुधवारी दुपारच्या सुमारास घडला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यात एका कारमधून पाच जण उतरले. त्यांनी तोंडाला रूमाल बांधलेला होता. एका मागून एक जण असे पाच जण हातात बंदुका घेऊन आल्यानंतर गोळीबार केला. या गोळीबारमध्ये माजी नगरसवेक बाळू मोरे थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

    गोळीबाराची ही घटना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला? हे अद्याप समोर आलेलं आहे. याची गंभीर दखल घेत चाळीसगाव पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आहे.

    जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी चांगलेच डोकं वर काढू लागली आहे. वारंवार होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन भाईगिरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवाळल्या पाहिजे.

    मुलाला ‘सचिन’ बनविण्यासाठी वडिलांनी केली टर्फ विकेट, संजय धस यांनी उलगडला वर्ल्ड कपपर्यंतचा प्रवास

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed