लोकसभेसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन
आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांची भूमिका महत्वपूर्ण आहे. मुस्लिम मतदार निसटू नये यासाठी आमदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापुरातील प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. बुधवारी सायंकाळी सोलापूर शहरातील केएमसी गार्डन या ठिकाणी स्थानिक नेते नजीब शेख यांनी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे कार्यक्रमाला आवर्जून हजर होत्या. भाषण करताना प्रणिती शिंदेंनी मुस्लिम महिलांना आणि पुरुषांना आवाहन करत लोकसभेच्या निवडणुकीसाठी अप्रत्यक्षपणे प्रार्थनेसाठी आवाहन केले आहे.
देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता आली तरच तुम्ही सुरक्षित : प्रणिती शिंदे
देशातील आणि राज्यातील जातीय समीकरण बदलले आहे. समाजात द्वेष निर्माण झाला आहे. दलित, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक हे सुरक्षित नाहीत. देशात काँग्रेसची सत्ता आली तरच अजमेर सुरक्षित राहील असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. भारतात फक्त काँग्रेस ही एकमेव पार्टी अशी आहे जी भाजप आणि नरेंद्र मोदी यांना हरवू शकते. म्हणून मला अजमेरला जाण्याअगोदर वचन द्या, आगामी सर्व निवडणुकांत फक्त काँग्रेसला मतदान कराल, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.