• Mon. Nov 25th, 2024
    खेड ते मुंबई, उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरे यांचा ‘वंदे भारत’ने हायस्पीड प्रवास

    रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह कोकण दौऱ्यावर होते. चिपळूण येथील सभेनंतर मुंबईला परत येताना ठाकरेंनी रेल्वे मार्गाने परत येणे पसंत केले. ठाकरेंनी वंदे भारत ट्रेनने खेड ते मुंबई प्रवास असा सपत्नीक प्रवास केला.

    वंदे भारत या सेमी हायस्पीड ट्रेनने उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरे यांनी खेडहून मुंबई गाठली. यावेळी प्रवासात त्यांच्यासोबत पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत आणि इतर पदाधिकारी सोबत होते. ठाकरेंच्या रेल्वे प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर अल्पावधीतच व्हायरल झाले. कोकण दौऱ्यात ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली.

    अमित शाहांनी ‘सिमी’वरची बंदी वाढवली, आठवडाभरात संशयित आसिफ दाढी अजितदादांच्या भेटीला
    ‘पक्षाला ‘शिवसेना’ हे नाव देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असला, तरीही ते नाव काढण्याचा अधिकार आयोगाला नाही. आम्ही शिवसेना हे नाव कोणाला घेऊ देणार नाही. आम्ही निवडणूक आयोगाला ‘दगड्या आयोग’ असे नाव ठेवले तर चालेल काय,” अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूरमधील सभेत निवडणूक आयोगावर टीका केली होती.

    ‘ज्या गद्दारांनी आपले सरकार पडले, त्यांच्या नाकावर टिच्चून मी पुन्हा एकदा शिवसेनेचे सरकार स्थापन करून येत्या लोकसभा निवडणुकीत लाल किल्ल्यावर फडकवून दाखवतो,’ असे खुले आव्हान शिवसेना उद्धव ठाकरे यांनी दिले. ‘तुम्ही वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांना निवडून दिले नसते, तर इकडे सगळी गुंडागर्दी आणि गँगवॉर झाले असते,’ अशी टीकाही त्यांनी केली.

    श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवशी ‘वर्षा’वर गुंड, भेट घडवणाऱ्या युवासेना पदाधिकाऱ्याची हकालपट्टी
    उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा दौरा झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी पहिल्या दिवशी सावंतवाडी, कुडाळ, मालवण आणि कणकवली अशा ठिकाणी चार सभा झाल्या. या सगळ्या सभांमधून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर यांच्यावर शरसंधान साधले.

    बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत केली, राजन साळवींना बळ देत एसीबी अधिकाऱ्यावर ठाकरे बरसले

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed