• Mon. Nov 25th, 2024
    बारामतीत अजितदादांची तोफ कडाडली; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा घेतला समाचार, म्हणाले…

    बारामती: मी राजकीय कारकिर्दीत अनेकांना पदे दिली. मानसन्मान मिळवून दिला, पण त्यातीलच काही मंडळी कुठे अध्यक्ष होताहेत, गावोगावी घोंगडी बैठका घेत आहेत. शहर, तालुक्याचा विकास कोणी केला हे त्यांनी त्यांच्या मनालाच विचारावे. मी जरा कोणाला काही बोललो की फोन करून बघा कसा बोलतोय असे सांगत आहेत. अशी लोक ओवाळून टाकली पाहिजेत, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समाचार घेतला. बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी यावर भाष्य केले.
    जेलमध्ये जाऊन आल्यावर माणूस मोठा होतो, म्हणून मी जेलमध्ये गेलो, रत्नाकर गुट्टे यांचं वक्तव्य
    पवार म्हणाले, एका जमिनीच्या विषयासंबंधी माझी आई कोर्टात गेली होती. तिने तेथील अस्वच्छता पाहिली. त्यानंतर मला सांगितले की, तू बारामतीचा आमदार आहे. स्वच्छतेबाबत तुझे कौतुक होते. पण जरा कोर्टात जाऊन अवस्था पहा, त्यावर मी त्रयस्थ व्यक्तीला तेथे जाऊन पाहणी करायला सांगितले. मी मागे कोर्टात गेलो होतो. पण तेथील न्याय व्यवस्थेला ते आवडले नव्हते. त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने मी यावेळी त्यांच्या क्षेत्रातील एका मान्यवराला सांगून तेथील कामे पूर्णत्वाला नेतो असा शब्द दिला. मी तेथे राज्य शासनाच्या माध्यमातून रंगरंगोटी, लॅण्डस्केपिंग करून देतो. बारामतीच्या नागरिकांना कोर्टात गेल्यावर जर स्वच्छ वाटत नसेल तर तो आमचा आणि बारामतीकरांचा कमीपणा आहे.

    शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं? त्यांच योगदान काय ते त्यांनी सांगावं | नारायण राणे

    शरद पवार गटाचे तालुका आणि शहराध्यक्ष वकील आहेत. याचा संदर्भ घेत उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, आपले वकील बाकीच्या ठिकाणीच फार लक्ष देतात. कुठे अध्यक्ष होतात, काय होतात. त्यांनी मनाला विचारावे की बारामती शहर, तालुक्याचा विकास कोणी केला. यातील अनेकांना मी मोठे केले, त्यांना पदे दिली, मानसन्मान दिला. हे लोक कोणाला माहित पण नव्हते. त्यातील अनेकांनी माझ्या तरुणपणात माझ्यासोबत काम केले आहे. पण आता ते गावोगावी घोंगडी बैठका घेत आहेत. मी कोणाला काय बोललो की बघा कसा बोलतो असे म्हणत आहेत, असे लोक ओवाळून टाकले पाहिजेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed