• Sat. Sep 21st, 2024
मठात दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या दुचाकींची चोरी, पोलिसांनी सापळा लावला अन् आरोपी अडकले

म. टा. प्रतिनिधी, पुणे : दुचाकी चालविण्याची हौस भागविण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी तीन दुचाकी चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. सहकारनगर पोलिसांनी संबंधित मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

सातारा रस्त्यावरील शंकर महाराज मठात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दुचाकींची चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सहकारनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार ११ जानेवारीला वाहन चोरी, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग आणि गुन्हेगार तपासणीचे काम करीत होते. मठाच्या परिसरातील दुचाकी वाहनतळाजवळ तपास पथकाने सापळा लावला होता.
आम्हाला धमकावण्याचा परवाना कुणाकडेही नाही, मालदीवच्या राष्ट्रपतींचा चीन दौऱ्यानंतर सूर बदलला
त्यावेळी दोन मुले एका दुचाकीवरून आले. त्यांनी त्यांची दुचाकी जवळच्या एका इमारतीसमोर लावली. त्यानंतर ते वाहनतळात आले. तेथे त्यांच्याकडील चावीने इतर गाड्यांचे हँडल लॉक उघडण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्यांनी धाड टाकून दोन्ही मुलांना ताब्यात घेतले. तसेच, त्यांची दुचाकीदेखील ताब्यात घेतली. त्यांच्याकडे कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्या दोघांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले.
कोण आहे व्रतिका गुप्ता? आधी रोल्स रॉयस आणि आता मुंबईत खरेदी केले ११६ कोटींचे पेंटहाऊस
मुलांना विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्यांच्याकडील गाडी चोरीची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आणखी दोन दुचाकी चोरल्याचे त्यांनी सांगितले. चोरी केलेल्या दुचाकी लोअर इंदिरानगर येथे पार्किंग केलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या मुलांना दुचाकीवर फिरवण्याची हौस होती. मात्र, घरी दुचाकी नाही आणि विकत घेऊ शकत नाही; म्हणून त्यांनी दुचाकी चोरल्याचे सांगितले. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे, निरीक्षक (गुन्हे) संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहायक उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलिस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतारे, बजरंग पवार, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, विशाल वाघ, सागर कुंभार यांनी केली आहे.

महाराष्ट्रात लवकरच थंडीची लाट, ‘या’ तारखेपासून राज्यभरात पारा घसरणार, हवामान विभागाचा अंदाज
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed