• Mon. Nov 25th, 2024
    कोविडमध्ये भावाचं निधन; कुटुंबाचा भार सांभाळला, आता शेतकरीपुत्राचा यूपीएससी परीक्षेत डंका

    जालना: जिल्ह्यातील आनंदगाव येथील एका शेतकरी पुत्राने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नुकत्याच लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचा ऑल इंडिया रँक १०२ आहे. डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर असं पद त्याला मिळणार आहे. कोविड काळामध्ये भावाचं निधन झाल्यानंतर कुटुंबाचा भार सांभाळत अजिंक्य शिंदे या शेतकरी पुत्राने यूपीएससी परीक्षेचं शिखर सर केलं आहे.
    रेल्वेमार्ग जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी राणाजगजितसिंह पाटील जाणार कोर्टात, वाचा नेमकं प्रकरण
    जालना जिल्ह्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातील अजिंक्य शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर त्याने परभणी येथील सारंग विद्यालयात शिक्षण घेतलं. इयत्ता आठवी ते बारावीचे शिक्षण त्याने ज्ञानतीर्थ विद्यालयात घेतलं. याच विद्यालयातील नितीन लोहट या शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा खुळ अजिंक्यच्या डोक्यात घुसलं. योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर त्याने अवघ्या दोनच वर्षांमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

    महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी त्याने पुणे गाठलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्याने बीएससीला ऍडमिशन घेतलं. दरम्यानच्या काळात आलेल्या कोरोनामध्ये त्याच्या मोठ्या बंधूचे निळकंठ शिंदे यांचं निधन झालं. त्यामुळे तो प्रचंड खचला. मात्र नंतर स्वतःला सावरून त्याने कुटुंबाचा भार सांभाळत पुणे येथे यूपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवला. अखेर नुकत्याच लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालामध्ये महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान अजिंक्य शिंदे यांनी मिळवला. सध्या तो सावित्रीबाई फुले विद्यापीठात एमएससीचे शिक्षण घेत आहे.

    महिन्याभरात आलो नाही तर फोटोला हार घाला सांगून अयोध्येला गेलो होतो, कारसेवकांनी थरारक अनुभव सांगितला

    जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील आनंदगाव या छोट्याशा गावचा मी रहिवासी आहे. शेती हा आई-वडिलांचा पारंपारिक व्यवसाय आहे. भावाच्या पाठबळामुळे मी यूपीएससी करण्याचे ठरवलं. मात्र कोविड काळामध्ये माझ्या भावाचे निधन झालं. तेव्हा मी खूप खचलो. मात्र पुन्हा नव्याने उभारी घेत अभ्यास केला आणि आज निकाल आपल्यासमोर आहे. खूप छान वाटतंय. डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर ही पोस्ट मला मिळेल, अशी शक्यता अजिंक्य शिंदे यांनी बोलून दाखवली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed