• Sat. Sep 21st, 2024
Video: उपचार सुरु असताना तरुणाला रॉडने मारहाण, महिला डॉक्टरचं डोकं फुटलं; चार जवानांची हकालपट्टी

छत्रपती संभाजीनगर : दोन गटात वाद झाल्यामुळे जखमी तरुणाला घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. जखमी तरुणावर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना दुसऱ्या गटातील काही तरुण तिथे आले आणि त्यांनी जखमी तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. यामध्ये महिला डॉक्टरला रॉड लागल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. दरम्यान, हा तुफान रडा सुरू असताना सुरक्षेसाठी तैनात असलेले एम.एस.एफ जवानांनी भांडण सोडून यासाठी मध्यस्थी न केल्यामुळे चार जवानांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयाच्या बाहेर दोन गटांमध्ये तुफान रडा झाला. या राड्यामध्ये जखमी तरुणाला घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तरुणावर उपचार सुरू असताना दुसऱ्या गटातील काही तरुण रॉड घेऊन उपचार सुरू असलेल्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांनी जखमी तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना देखील रॉड लागला. यात महिला डॉक्टरला डोक्याला रॉड लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल, ‘अटल सेतू’चे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
घाटी रुग्णालयामध्ये उपचार करत असताना महिला डॉक्टर व काही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. यामुळे अपघात विभागातील काही निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. या घटनेची माहिती घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांना मिळाली असल्याने डॉक्टरांची समजूत काढत दोषींवर कारवाई करण्याचा आश्वासन दिले. यावेळी डॉक्टरांनी संप मागे घेतला. या प्रकरणी प्रशासनाच्या वतीने बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे.

घाटी रुग्णालयात अनुचित प्रकार घडू नये यासाठी एम.एस.एफचे जवान तैनात करण्यात आले आहे. मात्र, हा प्रकार सुरू असताना कर्मचाऱ्यांनी कुठली मध्यस्थी केली नाही. यामुळे चार जवणानांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

मुंबईची जीवनवाहिनी ४०० किमीपार, बेलापूर-सीवूड-उरण मार्गाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed