प्रकल्प मंजूर – जानेवारी २०१८
मंजूर प्रकल्प खर्च – २,७८२ कोटी
सद्यस्थिती
खर्च – ५० टक्के
प्रत्यक्ष काम – ५० टक्के पूर्ण
भूसंपादन
– ५६.८२ हेक्टर खासगी जागा
– ४.४ हेक्टर सरकारी जागा
– ९.१३ हेक्टर वनजमीन
नव्या स्थानकांची पायाभरणी
– चिखली, मोहापे, चौक या नव्या स्थानकांसाठी ऑगस्ट २०२३मध्ये कंत्राटदार नियुक्त
– सप्टेंबरपासून स्थानक इमारत उभारणीसाठी पायाभरणीसह अन्य कामे सुरू
बोगद्यांच्या कामाला गती
– नव्या रेल्वे मार्गात तीन बोगदे असून यातील टी-१ (टनेल -१) बोगद्याचे २१९ मीटरचे काम पूर्ण
– टी-२ बोगद्याचे ९४४ मीटरचे खोदकाम पूर्ण
– टी-३ बोगद्याचे १२२ मीटरचे खोदकाम पूर्ण
लहान-मोठ्या पुलांची सद्यस्थिती
बांधकाम – पूर्ण झालेले – बाकी असलेले
मोठे पूल – ३ – ५
लहान पूल – १७ – १६
आरयूबी (रोड अंडर ब्रीज) – ४ – ११
(सर्व पुलांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती पूर्ण)
रेल्वे उड्डाणपुलांची स्थिती
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल
– पुलांच्या गर्डरला आधार देणाऱ्या दोन्ही बाजूंकडील खांबांची उभारणी पूर्ण
– ४ गर्डरपैकी डिसेंबर २०२३ ला पहिल्या गर्डरची यशस्वी उभारणी
पनवेल रेल्वे उड्डाणपूल
– पुलाच्या डेक स्लॅबचे काम सुरू
– एका मार्गिकेवरील १७ स्पॅन उभारणी पूर्ण
कर्जत रेल्वे उड्डाणपूल
– पुलाच्या डेक स्लॅबचे काम सुरू
– एका मार्गिकेवरील १७ स्पॅन उभारणी पूर्ण
मोहापे रेल्वे उड्डाणपूल
– पुलाच्या गर्डर जोडणीचे काम सुरू
– गर्डरचा आधार देणाऱ्या खांबाचे काम पूर्ण
नव्या दुहेरी रेल्वे मार्गाचे काम नियोजनानुसार सुरू आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार आहे.
– सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मुंबई रेल्वे विकास महामंडळ