• Mon. Nov 25th, 2024
    रिक्षाचालक जाणार संपावर? रिक्षाचालक संघटनांच्या बैठकीत ‘हिट अ‍ॅंड रन’ कायद्याला विरोध

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने हिट अँड रन हा कायदा लागू करणार नाही, असे आश्वासन दिले आहे. मात्र हा कायदा तयार करण्यात आला आहे. तो कधीही लागू केला जाऊ शकतो. या कायद्यामुळे रिक्षाचालकांचे हाल होतील. यामुळे हा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी आंदोलन करण्याबाबत रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक स्व. मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्या कार्यालयात घेण्यात आली.

    या बैठकीत रिक्षाचालक-मालक महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद, अखिल भारतीय छावा युनियन अध्यक्ष प्रकाश हेडगे पाटील, भीमशक्ती रिक्षा चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वानखेडे, काँग्रेस ऑटो रिक्षा युनियन अध्यक्ष बशीर भाई, राजीव गांधी ऑटो रिक्षा युनियन. एम. के. अखिल ऑटो रिक्षा युनियन, मनोज जैस्वाल-रोषन रिक्षा युनियन महमद फारूख, यांच्यासह बिसन लोधे, दिपक पाटील यांच्यासह अन्य रिक्षा युनियनच्या पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तांसह पोलिस उपायुक्त यांच्यासोबत रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीतील अनेक मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. त्याबाबत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    या वेळी स्थानिक मागण्यांसाठी आंदोलन चालू ठेवून ‘हिट अँड रन’बाबत राज्य पातळीवरून आंदोलनाची घोषणा झाल्यास शहर आणि ग्रामीण भागांतील सर्व रिक्षाचालक आंदोलनात सहभागी होतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
    नेरूळ-उरण रेल्वेलाही १२ जानेवारीचा मुहूर्त? पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता
    राज्यस्तरीय नेत्यांशी ऑनलाइन संवाद

    या बैठकीत हिट अँड रन या प्रकरणात आंदोलनबाबत स्थानिक रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी यांनी नागपूरचे विलास भालेकर, मुंबईचे शशांक राव, पिंपरी-चिंचवडचे बाबा कांबळे, नांदेडचे नरेंद्र गायकवाड यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. या वेळी राज्य पातळीवरून याबाबत निर्णय घेण्याचीही चर्चा करण्यात आली.

    आरटीए कमिटीची बैठक घ्या

    शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना स्टॅँड नाही. प्रवासी मुख्य रस्त्यावरील कोणत्या ड्रॉप पॉइंटवर सोडावे, हे माहिती नाही. शेअरींग रिक्षाचे दर जाहीर झालेले नाहीत; तसेच ई-रिक्षाबाबत काय नियम असावेत? याचीही माहिती समोर आलेले नाही. या सर्व स्थानिक मुद्द्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed