• Sat. Sep 21st, 2024
बसमध्ये ४७ प्रवासी; एसटीच्या स्टेरिंगमध्ये बिघाड; अचानक ताबा सुटला अन् गाडी थेट…, १७ जण जखमी

कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील शेडशाळ माळभाग येथे एस टी बसच्या स्टेरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील ४७ पैकी १६ ते १७ प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या बसमध्ये अनेक विद्यार्थी ही प्रवास करत होते. स्टेरिंग फिरत नसल्यामुळे बसवरील ताबा सुटून ही एस टी बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या चरीमध्ये गेली. अपघात झाल्याचे पाहून त्वरित ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना बसमधून बाहेर काढत प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.
कर्तव्य बजावत असताना नियतीनं डाव साधला, पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत, मुलाचं पितृछत्र हरपलं
मिळालेल्या माहितीनुसार, कुरुंदवाड आगारातून एसटी बस गणेशवाडीला जात होती. यावेळी अचानक समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना स्टेरिंगमध्ये बिघाड झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट जवळच असलेल्या चरीमध्ये गेली. या वेळी बसमध्ये सुमारे ४७ प्रवासी होते. ज्यामध्ये महिला आणि विद्यार्थ्यांचा ही समावेश होता. दुर्घटना होताच परिसरातील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तातडीने मदतीसाठी धावून गेले. सर्वांना बाहेर काढत जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

विरोध झुगारुन व्यवसायाला सुरुवात, वंदना कऱ्हाळे यांचा प्रेरणादायी प्रवास

दरम्यान ही घटना समजतात कुरुंदवाड आगार विभागाचे अधिकारी तसेच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान एसटी बसचा अपघाताची ही गेल्या दोन महिन्यातील दुसरी घटना असून याआधी शियेफाटा येथे देखील एसटीवरील ताबा सुटल्याने पहाटे एसटी बाजूच्या कठड्याला जाऊन पलटी झाल्याचे घटना घडली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed