• Sat. Sep 21st, 2024
कर्तव्य बजावत असताना नियतीनं डाव साधला, पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत, मुलाचं पितृछत्र हरपलं

रायगड: अलीकडे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये ही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस खात्यामध्येही काही कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. असाच एक दुर्दैवी मृत्यू रायगड जिल्ह्यात पनवेल तुर्भे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याचा झाला आहे. तुर्भे पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्याचा गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
व्यायामशाळेच्या जागी इमारत, तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, पालकमंत्र्यांसमोर तरुणाचं धक्कादायक कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद सावंत असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते ४४ वर्षाचे होते. ते मूळचे तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मात्र गेले अनेक वर्ष नोकरी निमित्ताने डोंबिवली परिसरात आपल्या पंधरा वर्षाच्या मुलासह वास्तव्यास आहेत. गुरुवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या तुर्भे पोलीस ठाणे हद्दीतील महापे येथील बिट नं १ येथे रात्रपाळी करत होते. दरम्यान पहाटे सहा दरम्यान सावंत यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना जवळच असलेल्या नवी मुंबई पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या देशाच्या इतिहासात, भुगोलात काँग्रस सहभागी, १३८ वर्षांनंतरही काँग्रेस जिवंत असेल | इमरान प्रतापगढी

सकाळी साडेसहाच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्शवभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या रजा नामंजूर करण्यात करण्यात आल्याचा विषय सध्या चर्चेत आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासाठी या रजा नामंजूर करण्यात आल्याची चर्चा आहे. अशातच कर्तव्य बाजावताना सावंत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने परिसरातून आणि पोलीस खात्यातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या गावी करताच या घटनेने शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed