• Sat. Sep 21st, 2024

लहान भावाच्या मृत्यूने धक्का, दु:ख सहन झालं नाही अन् एकाच घरातून निघाली दोन भावांची अंतयात्रा

लहान भावाच्या मृत्यूने धक्का, दु:ख सहन झालं नाही अन् एकाच घरातून निघाली दोन भावांची अंतयात्रा

अमरावती: मार्गावरील लखापूर फाट्याजवळ घडलेल्या अपघातात धाकट्या भावाचा मृत्यू झाल्याचे कळताच हृदयविकाराच्या धक्क्याने थोरल्या भावाचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेनंतर दोन्ही भावांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मो. खालिक मो. अजमत (वय ५८) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर, मो. जावेद मो. अजमत (वय ६०) असे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या भावाचं नाव आहे. मो. खालिक हे शुक्रवारी लखापूर फाट्याजवळील आपल्या शेतात कापूस वेचण्याकरिता मजूर घेऊन गेले होते. सायंकाळी मो. खालिक हे ट्रॅक्टरमध्ये कापसाचे गाठोडे लावत होते. त्यावेळी मागून भरधाव आलेल्या आमदार बळवंत वानखडे यांच्या कारने त्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात मो. खालिक यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर सहा मजूरसुद्धा जखमी झाले होते. अपघातात कारचालक आणि आमदार बळवंत वानखडे यांच्या स्वीय साहाय्यकासही किरकोळ दुखापत झाली होती.

पगाराचे पैसे हातात पडताच पार्टीला गेले, २५ वर्षांचा तरुण अचानक टेबलवरच आडवा पडला अन्….
अपघाताची माहिती मिळाल्यावर दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी कारचालक अंकुश डोंगरदिवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान, मो. खालिक यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

अपघातात धाकटा भाऊ मो. खालिकचा मृत्यू झाल्याचे कळताच थोरले भाऊ मो. जावेद यांना मोठा धक्का बसला. त्यांना काही वेळातच हृदयविकाराचा तीव्र धक्का आला, त्यात त्यांचाही मृत्यू झाला. दोन्ही भावांची अंत्ययात्रा एकाचवेळी निघाल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. दोन्ही भावांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिकनसाठी सख्खा भाऊ झाला वैरी, मोठ्या भावासोबत जे केलं ते पाहून आईला धक्का
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed