प्रसाद
पूजेसाठी विहीर, नदीतील नवीन पाणी सोबत ठेवून पूजेसाठी बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात धुऊन हातात बेलपाने व डोवीतील फुलहार घेऊन पाती घ्यावी लागते. अशी पाच किंवा सात जणांची पूजा झाल्यावर देवपूजा संपल्यावर देवाला व धरणीमातेला वंदन केले जाते. यासाठी आलेल्या सर्व व्यक्तींना प्रसाद म्हणून जेवण दिले जाते.
आठीवटी पूजा
आठीवटी पूजेत प्रामुख्याने साळ (तांदूळ), मोठी कणगी (ज्वारी), मोठी भेंडी, अस्तंबा यात्रेवरून आणले जाणारे रोषा हे सुगंधित गवत, मुसड, सूप, फुलहार, महूची डोवी, बेलाची पाने, सुटे पैसे, बोत, नारळ, दिवा या संसारिक उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंची पूजा आरोग्य, धनसंपत्ती, पशूधन, पुरेसे अन्नधान्य वर्षभर लाभो यासाठी करण्यात येते.
अस्तबांचं शिखर
अस्तंबाच्या शिखरावरून उतरल्यानंतर आपापल्या सवडीनुसार हे बांधव आठीवटी पूजेसाठी कुटुंबात तयारी सुरू करतात. गावातील सर्व मंडळींच्या सोयीनुसार हा पूजाविधी होतो. रात्रीच्या वेळी होणारी आणि पाच ते सात दिवस चालणारी ही पूजा गावातील प्रमुख पुजाऱ्याकडून केली जाते.
अन्नधान्य
मुबलक अन्नधान्य व्हावे यासाठी कणीमातेकडे या पूजेच्या माध्यमातून प्रार्थना केली जाते. सातपुड्यातील डोंगरदऱ्यात राहणारा आदिवासी बांधव आपल्या शेतातील पीक पेरणीपासून त्याची काढणी होऊन सेवन करेपर्यंत अन्नधान्यासाठी विविध पूजा करतात.
कणी माता पुजा
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात सध्या आदिवासी कुटुंबांमध्ये कणीमातेच्या पूजेची रेलचेल आहे. यानिमित्त आदिवासी बांधव एकमेकांकडे जाऊन पूजा करतात आणि पाहुणचारही घेतात. मुबलक अन्नधान्यासाठी कणीमातेचे पूजन श्रद्धा व भक्तिभावाने केले जाते. धडगाव तालुक्यातील अस्तंबा ऋषींच्या यात्रेनंतर सातपुड्यातील आदिवासी बांधव ही पूजा करताता त्याला स्थानिक भाषेत ‘आठीवटी’ म्हटले जाते.