• Sat. Sep 21st, 2024

मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपुरात शून्य भंगार मोहीम, भंगार विकून रेल्वेने कमावले २४८ कोटी

मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपुरात शून्य भंगार मोहीम, भंगार विकून रेल्वेने कमावले २४८ कोटी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या आठ महिन्यांत भंगार विक्रीतून मध्य रेल्वेने २४८ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. भंगार विक्रीसाठी रेल्वेच्या सात विभागांत मोहीम राबवण्यात आली होती.

मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर आणि लोको डेपोसह अन्य विभागांचा यात समावेश होता. भुसावळ विभागाने सर्वाधिक भंगार विक्री करत अग्रक्रमांक पटकावला आहे. रेल्वे विभागातील जागेचा सर्वाधिक वापर करण्यासाठी शून्य भंगार मोहीम रेल्वे मंडळाने हाती घेतली. रेल्वे रूळ, आर्युमान पूर्ण झालेले रेल्वेडबे, इंजिन, ओव्हरहेड वायरसह अन्य यांत्रिक उपकरणे विकून रेल्वे जागा वापरात आणण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने एप्रिल ते ३० नोव्हेंबरअखेर भंगार विक्रीतून २४८.०७ कोटी रुपये महसूल मिळवला. निर्धारीत लक्ष्यापेक्षा हे उत्पन्न ८२ टक्के अधिक आहे.

भंगार विक्रीची विभागवार कमाई

विभाग कमाई (कोटींमध्ये)

मुंबई ३६.३९

भुसावळ ४९.२०

पुणे २२.३१

सोलापूर २०.७०

नागपूर २२.३२

माटुंगा डेपो ४०.५८

इलेक्ट्रिक लोको शेड डेपो, भुसावळ २३.६७

इतर ठिकाणी ३२.९०

Nagpur Accident: नागपुरात लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात, सहाजणांचा दुर्दैवी मृत्यू
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed