• Sat. Sep 21st, 2024
मला आयुष्यात स्ट्रगल करणं कठीण आहे; जीवलग मित्राला मेसेज केला, अन्….

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून जिल्ह्यातील तरुणांना मोठा धक्का बसला आहे. ग्रामीण भागामध्ये रहाणाऱ्या एका तरुणाने धक्कादायक मेसेज मित्राला पाठवून आपण आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

”आयुष्यात स्ट्रगल करणे खूप कठीण आहे. तसे माझ्या घरातील लोकांना समजावून सांग”, असा आपल्या खास मित्राला मेसेज पाठवून शिरशिंगे वीरवाडी येथील एका २२ वर्षीय तरुणाने माजगाव येथे भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. साहिल सुनिल राऊळ (मुळ रा. शिरशिंगे) असं त्याचं नाव आहे. तो चार दिवसांपूर्वी माजगाव येथे राहायला होता. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गारठ्याबरोबर प्रदूषणातही वाढ, मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली
मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावामध्ये राहणाऱ्या साहिल याने आयटीआयचे शिक्षण घेतले होते. ४ दिवसांपूर्वी तो माजगाव उद्यमनगर येथील एका कंपनीत अपरेटिस म्हणून काम करत होता. तर सायंकाळच्या वेळेत शहरातील एका चायनिजच्या दुकानात काम करत होता. दरम्यान, गेले काही दिवस त्याला नैराश्य आले होते.

काल दुपारी त्याचा मित्र सुंदर सिताराम राऊळ याला त्याने दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ”मला आयुष्यात स्ट्रगल करणे कठीण आहे. ते माझ्या घरातील लोकांना समजावून सांग”, असा मेसेज पाठवला. यावेळी सुंदर याने त्याला नेमकं काय झाले? हे विचारण्यासाठी पुन्हा फोन केला. परंतू त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे त्याला संशय आला. त्याने तात्काळ याबाबतची माहिती आपला भाऊ न्हानू याला दिली आणि ते शिरशिंगे येथून माजगाव येथे आले.

माजगाव येथे येताच त्या ठिकाणी भाड्याच्या खोलीत जाऊन त्यांनी पाहणी केली असता साईल याचा मृतदेह फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी सावंतवाडी पोलिसांना दिली. त्यानुसार हवालदार हनुमंत धोत्रे व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साईल याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. एकुलता एल लेक गेल्याने आई-वडिलांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.

Mumbai Local Block: पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आज मध्यरात्री ते उद्या पहाटेपर्यंत ब्लॉक, कारण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed