• Sun. Sep 13th, 2026
पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आज मध्यरात्री ते उद्या पहाटेपर्यंत ब्लॉक, कारण…

मुंबई : अंधेरीस्थित गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी आज, मंगळवारी मध्यरात्री १.१० ते उद्या, बुधवारी पहाटे ४.४०पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. अप-डाउन हार्बरसह अप-डाउन धीम्या-जलद मार्ग आणि पाचव्या-सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

आज रद्द राहणाऱ्या लोकल फेऱ्या

– विरार-अंधेरी : रात्री १०.१८

– वसई रोड-अंधेरी : रात्री ११.१५

– चर्चगेट-विलेपार्ले : मध्यरात्री १२.३०

आंदोलनाची टोपी कोण फिरवतेय? संविधान चौकात बॅनर, मराठा आरक्षणावरून शरद पवारांवर टीका
उद्या रद्द राहणाऱ्या लोकल फेऱ्या

– अंधेरी-विरार : पहाटे ४.२५

– वांद्रे-बोरिवली : पहाटे ४.०५

– बोरिवली-चर्चगेट : पहाटे ४.५३

– अंधेरी-विरार : पहाटे ४.४०

– अंधेरी-चर्चगेट : पहाटे ४.०५

आज विलंबाने धावणाऱ्या लोकल

– विरार-चर्चगेट : पहाटे ३.२५ (१० मिनिटे)

– बोरिवली-चर्चगेट : पहाटे ४.०५ (१५ मिनिटे)

– विरार-बोरिवली : पहाटे ३.३५ (१० मिनिटे)

आयपीएलमध्ये प्रथमच लिलाव साकारणार भारतीय महिला, मल्लिका सागर आहे तरी कोण जाणून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed