• Sat. Sep 21st, 2024
घरातील व्यक्ती नेट वापरत होते; अचानक राऊटरचा स्फोट, तिघे जखमी, केबल चालकावर गुन्हा दाखल

ठाणे: कल्याणच्या पूर्व भागातील नवीन गोविंदवाडी भागात असलेल्या घरात रविवारी वायफाय राऊटरचा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. या स्फोट प्रकरणी वायफाय सेवा देणाऱ्या केबल चालकाच्या विरोधात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर कल्याणमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
महिला घरमालकाच्या भाच्याला सोडायला निघाली; टवाळखोर दुचाकीस्वारांनी मारला कट अन् सगळंच संपलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील नवीन गोविंदवाडी भागात रामदेव चौधरी चाळ आहे. या चाळीतील सायम शेख यांच्या घरात वायफायची सेवा केबल चालक राजू म्हात्रे याची आहे. या वायफायचा राऊटर शेख यांच्या घरात बसविण्यात आला आहे. रविवारी नेहमीप्रमाणे राऊटर चालू होता. शेख यांच्या घरातील सदस्य घरात असतानाच अचानक राऊटरचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटात तीन जण जखमी झाले. राऊटर ठेवलेली जागा जळून खाक झाली.

विषय पूर्ण माहीत नसणाऱ्यांना मी उत्तर देत नाही, उद्धव ठाकरेंचा बंधू राज यांना टोला

टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांचे पाहणी पथक घटनास्थळी आले. तांत्रिक बाबी तपासल्यानंतर रहिवासी सायम शेख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी केबल चालकावर गुन्हा दाखल केला. राऊटरला प्रमाणापेक्षा अधिकचा वीज प्रवाह झाल्यामुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed