• Tue. Nov 26th, 2024

    आई मुकी, वडील अपंग, लेकीनं कुटुंबाचा गाडा हाकला; नागपुरातील स्फोटानं परिवाराचा आधार हरपला

    आई मुकी, वडील अपंग, लेकीनं कुटुंबाचा गाडा हाकला; नागपुरातील स्फोटानं परिवाराचा आधार हरपला

    नागपूर: जिल्ह्यातील बाजारगावमध्ये असलेल्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत रविवारी स्फोट झाला. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ६ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाल्याचं समजतं.

    सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांचं उत्पादन केलं जातं. या कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटात ९ कामगारांचा मृत्यू झाला. सोलर ग्रुपद्वारे संचालित इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड ही संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांची निर्मिती करणारी देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. आजच्या घडीला येथून भारतीय लष्कर, नौदलासाठी लागणाऱ्या विविध शस्त्रास्त्रांचं उत्पादन होतं. तसेच या कंपनीकडून तीसहून अधिक देशांमध्ये शस्त्रास्त्रांची निर्यात करण्यात येते.
    नागपूर हादरलं! स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट; ९ जणांचा मृत्यू
    कुटुंबाचा आधार गेला
    कंपनीतील स्फोटात मृत पावलेल्या कामगारांची नावं समोर आली आहेत. त्यात २३ वर्षीय आरती सहारे नावाच्या तरुणीचाही समावेश आहे. आरती तिच्या कुटुंबातील एकमेव कमावती होती. तिचे वडील – निळकंठराव यांना काही वर्षांपूर्वी पक्षाघाताचा अटॅक आल्यानं अपंगत्व आलं. तर आई वनिता या मूक आहेत.

    घरी अन्य कुणी कमावतं नसल्यामुळे आरतीनं लग्न केलं नाही. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिनं ४ वर्षांपूर्वी सोलर कंपनीत कामास सुरुवात केली. आरतीनं कमावलेल्या पैशातून लहान बहीण भारतीचं लग्न लावून दिलं. सोलर कंपनीत झालेल्या स्फोटात आरतीचा मृत्यू झाला आणि सहारे कुटुंबाचा आधार हरपला आहे.
    सातारा-लातूर महामार्गावर क्रेटाची दुचाकीला धडक; अपघातात एकाचा जागीच अंत
    कामगारांमध्ये रोष, संतापाची लाट
    स्फोट झाल्यानंतर वेगवेगळ्या युनिटमधील सर्व कर्मचारी बाहेर पडले. सकाळी ९ ते ९.३०च्या दरम्यान ही घटना घडली असून अद्याप कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले नाहीत. तसेच त्या युनिटमधील बचावलेल्या मात्र गंभीर जखमी असलेल्या कामगारांनादेखील उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आलेले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये संताप आहे. जोपर्यंत मृत कामगारांचे देह मिळत नाही तोपर्यंत प्रवेशद्वाराहून हटणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आलेले आहे.

    निखिल भुते यांच्याविषयी

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed