माहिती का दिली जात नाही?
कुपोषण व बालमृत्यू यांचा परस्पराशी संबध नाही असा दावा यंत्रणांकडून केला जातो. मात्र कुपोषित मुलांमध्ये संसर्गाचे व त्यामुळे निर्माण होणारी आरोग्याच्या संदर्भातील गुंतागुंत निर्माण होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते आहे. यासंदर्भात माहिती मागितली असता ती दिली जात नाही. एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अंतर्गत बालमृत्यूची माहिती प्रत्येक महिन्याला देणे अपेक्षित असले तरीही ही माहिती अपलोड केली जात नाही. यावर्षी एप्रिल, मे आणि जूनमधील माहिती देण्यात आलेली नाही.
रिक्त पदांचा प्रश्न केव्हा सुटणार?
अंगणवाड्यामध्ये लहान मुलांच्या शिक्षण व आरोग्य या दोन्ही पातळ्यांवर काळजी घेतली जाते. मात्र राज्यातील ५५३ प्रकल्पांत १,१०,४४४ अंगणवाड्या असून त्यात मुख्य अंगणवाड्यांची संख्या ९७,४७३ तर १२,९७१ मिनी अंगणवाड्या आहेत. त्यामधील रिक्त पदांचा प्रश्न आजही सुटलेला नाही. या अंगणवाड्यांमध्ये ११ हजार ७३१ पदे रिक्त आहेत. ऑक्टोबर २०२३च्या आयसीडीएसच्या अहवालानुसार राज्यात अंगणवाडी मदतनीस ते बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची एकूण ११,७३१ पदे रिक्त आहेत.
पदनाम/ रिक्त पदे
अंगणवाडी सेविका ५,०१५
मिनी अंगणवाडी सेविका ४४८
मदतनीस ४,५६४
अंगणवाडी पर्यवेक्षिका १,३९५
बालविकास प्रकल्प अधिकारी ३०९