• Sat. Sep 21st, 2024
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; पेणजवळ ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

अलिबाग: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पनवेलकडील मार्गिकेचे काँक्रीटीकरणाचे काम चालू असल्याने मुंबई गोवा महामार्गावर पेणजवळ आज वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा महामार्गावर लागल्या आहेत. सुमारे आठ किलोमीटरपर्यत या रांगा लागल्या आहेत.
मराठा आरक्षणाच्या अल्टिमेटमवर काथ्याकूट; सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला, बैठकीत काय चर्चा झाली?
विक एंड असल्याने पर्यटक आणि चाकरमानी बाहेर पडले होते. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. ट्रॅफिक जाममुळे त्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. महामार्गावरील पनवेलकडे जाणाऱ्या मर्गिकेचे काम चालू असल्याने कोकणात जाणाऱ्या मार्गिकेमधून दोन्ही बाजूची वाहतूक चालू ठेवली आहे. त्यामध्ये पेण शहरातून बाहेर पडणाऱ्या वाहनाने अधिक गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कोठेही वाहतूक पोलीस दिसून येत नाही.

१०० टक्के टिकणारं आरक्षण द्यायचंय, आमच्याकडे दोन पर्याय ; जरांगेंच्या भेटीनंतर महाजनांची ग्वाही

ट्रॅक्टर, ट्रेलर सारखी अवजड वाहने धिमा प्रवास करत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या मार्गावर सुमारे ८ किमी रस्ता पार करण्यासाठी एक तास लागत असल्याने प्रवासी चांगलेच त्रस्त झाले होते. याशिवाय मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असले तरी काही ठिकाणी ते रखडल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed