• Sat. Sep 21st, 2024
गजानन तौर हत्याकांडाला नवीन वळण लागण्याची शक्यता, पोलिसांना वेगळाच संशय; म्हणतात…

अक्षय शिंदे, जालना : जालन्यात सोमवारी भरदिवसा मंठा चौफुली परिसरात जालना किंग या नावाने प्रसिद्ध असलेला तरुण गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्तेनंतर जालना शहरात ”शरीर मिटता है नाम नहीं…” अशा आशयाच्या होर्डिंग तौर याच्या समर्थकांनी ठिकठिकाणी लावले होते. सोशल मीडियावर देखील तौर याच्या हत्येनंतर अनेकांनी व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवले होते. कॉमेंटमध्ये हळहळ व्यक्त होत होती. जालना किंग गजानन तौर याची हत्या का झाली असावी? अशी चर्चा जिल्हाभरात रंगताना दिसत होती, अनेक तर्क लावण्यात येत होते.

पहिल्या दिवसापासून पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. चार पथक नेमून आरोपीची शोध मोहीम सुरू होती. दरम्यान, सुरुवातीला ही हत्या जुन्या वादातून आणि पैशांच्या वादातून झाली असल्याचा सांगण्यात येत होतं. मात्र, आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून ते एकत्र कसे आले? ही हत्या सुपारी घेऊन तर झाली नाही ना? असा संशय पोलिसांना आला असून पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.

पुण्यात विद्यार्थी, बॅचलर्सना रुम भाड्याने देणाऱ्या मालमत्ताधारकांच्या करात मोठी वाढ होणार?
गजानन तौर याच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी लक्ष्मण गोरे, रोहित ताटीमापुलवार हे पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना न्यायालयाने १० दिवसांची २२ डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर संशयित आरोपी भागवत डोंगरे याच्यावर चाकूने वार झाल्याने त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तर टायगर (नाव माहिती नाही) नावाचा आरोपी फरार आहे. दरम्यान, तौर खून प्रकरणातील पाचपैकी दोन आरोपींचा जालना – नांदेड असा प्रवास असल्याने या आरोपींनी एकत्रित येत सुपारी घेऊन तर ही हत्या केली नाही ना? या दृष्टीनेही जालना पोलीस खोलावर जाऊन तपास करत आहेत.

नव्या संशयाची सुई अद्याप पोलिसांच्या हाताला न लागलेल्या टायगर (नाव माहीत नाही) याच्यावर आहे. आरोपीने या पूर्वी सेवली भागात जमिनीच्या वादातून एकाची हत्या केल्याचा पोलीस रेकॉर्ड आहे. आरोपीची पार्श्वभूमी पाहता त्याचा या हत्या प्रकरणातील सहभाग पोलिसांना सुपारी दिली असल्याचा संशय येण्यासाठी कारण ठरतेय. त्यामुळे या हत्या प्रकरणाचे गुड या आरोपीच्या शोधानंतरच संपेल असं दिसतंय.

चालत्या रिक्षाला कार आडवी, तरुणाची क्रूर हत्या, माजी पंचायत समिती सभापतीचं धक्कादायक कृत्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed