• Mon. Sep 7th, 2026
चालत्या रिक्षाला कार आडवी, तरुणाची क्रूर हत्या, माजी पंचायत समिती सभापतीचं धक्कादायक कृत्य

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून माजी सभापतीने तरुणाचे हात छाटल्याची घटना घडली आहे. मुरबाड पंचायत समितीच्या माजी सभापतीने गावातील एका तरुणावर भररस्त्यात आपल्या साथीदारांच्या मदतीने तलवारीने सपासप वार करून त्याची हत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडून भीतीचे वातावरण पसरलं आहे.

मुरबाडमध्ये पोलिसांच्या गस्तीने सर्वत्र शांतता व सुव्यवस्था असतानाच आज संध्याकाळी मुरबाड बारवी धरण रस्त्यावरील शाळेसमोर देवपे गावातील तरुण सुशील भोईर (वय २७ वर्ष) हा रिक्षाने जात असताना मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती श्रीकांत धुमाळ आपल्या साथीदारांसह कारने येऊन रिक्षा अडवली. सुशीलला बाहेर काढून तलवारीने सपासप वार करत दोन्ही हात छाटून टाकले. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी श्रीकांत धुमाळ याच्यासह त्याचा मेहुणा अंकुश खारीक, नितीन धुमाळ व इतर यांच्यावर मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुण्यात विद्यार्थी, बॅचलर्सना रुम भाड्याने देणाऱ्या मालमत्ताधारकांच्या करात मोठी वाढ होणार?

Pune News : ‘डीजे’विरोधात ध्वनिवर्धन! पुण्यातील मोर्चात बंदीची मागणी, राजकीय नेत्यांचाही समर्थनाचा सूर, पण मोर्चाला विद्यानंद बापट अनुपस्थित; कारण काय?
Yavatmal News: यवतमाळमध्ये भूदानची 33 हजार एकर जमीन बेपत्ता; गैरव्यवहाराची चौकशी सुरु, मोहा गावातील 50 जणांना नोटीस
Baramati Accident : बारामतीहून दहीहंडीसाठी पुण्यात निघाले, नियंत्रण सुटल्याने बाईक घसरली, खाली पडताच भरधाव वाहनाने उडवलं; तरुणाचा जागीच अंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed