• Mon. Nov 25th, 2024
    उद्धव ठाकरे यांचा धारावीतील मोर्चा कशासाठी? देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर दिलं, म्हणाले…

    पुणे: अदानी समूह करत असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात उद्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्याची तयारी मुंबईत सुरू आहे. धारावीचा पुनर्विकास करताना ३०० चौरस फुटांची घरे देण्यात येणार आहेत. त्याऐवजी ४०० ते ५०० चौरस फुटांची घरे द्यावीत, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा मोर्चा काढत आहे. शिवसेनेच्या या मोर्चावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
    शेतमालाला भाव नाही,पैशांशिवाय जगता येत नाही, लग्नाशिवाय मरता येत नाही, काय करू? लग्नाळू शेतकरी तरुणांचा सवाल
    उबाठा सेनेला धारावीच्या गरिबांना घरं मिळू द्यायची नाहीत. हा प्रकल्प त्यांना डिरेल करायचा आहे. यामध्ये नवीन कंत्राटदारांच्या सगळ्या अटी शर्ती उद्धव ठाकरे यांनीचं मुख्यमंत्री असताना ठरवलेल्या आहेत. आता उद्धव ठाकरे दुटप्पी भूमिका घेत आहेत. केवळ टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाचा काही परिणाम होणार नाही. आम्ही धारावीकरांना पक्की घर देणार म्हणजे देणारचं. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

    खर्च पण निघेना, आमच्या खिशातले पैसे जातायत; निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना फटका

    आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही धारावीची ओळख आहे. जवळपास ६०० एकरवर धारावी वसली आहे. धारावीत ६० हजारांहून अधिक झोपड्या असून त्यात १० लाखांहून अधिक लोक राहतात. शिवाय धारावीत १३ हजारांहून अधिक लघु उद्योग आहेत. लघु उद्योगांतून धारावीमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे धारावीसाठी निघणाऱ्या या मोर्चावरून आता राज्यातलं राजकारण तापलं आहे. महाराष्ट्र सरकारने उद्धव ठाकरे यांच्या या मोर्चाला आतापर्यंत परवानगी दिलेली नाही. त्यावरूनच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या रंगत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *