• Sat. Sep 21st, 2024

पोलिस भावासाठी माजी नगरसेविकेचा धाडसी निर्णय, पण यकृतदान करुनही नियतीला टाळू शकले नाही

पोलिस भावासाठी माजी नगरसेविकेचा धाडसी निर्णय, पण यकृतदान करुनही नियतीला टाळू शकले नाही

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील आचरा पोलिस ठाणे येथे चालक म्हणून सेवा बजावणारे अभिताज रमेशचंद्र भाबल (वय ४७, रा. तांबळडेग, ता. देवगड) यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. भाबल यांचे यकृत निकामी झाल्याने त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आपल्या भावाला मरणाच्या दारातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांची बहीण माधुरी काळे यांनी यकृत दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तरीही त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेल्याने त्यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. मात्र, बहिणीच्या अतूट मायेची ही अनोखी गोष्ट सर्वांनी अनुभवली.

भाबल हे १९९६ मध्ये पोलिस दलात रुजू झाले होते. सध्या ते आचरा पोलिस ठाण्यात हवालदार पदावर चालक म्हणून सेवा बजावत होते. अलीकडील काळात त्यांना तब्येत साथ देत नव्हती. म्हणून कुटुंबीयांनी मुंबईत उपचाराकरिता दाखल केले. यात त्यांचे यकृत निकामी झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला.

तुमच्या जमिनीत खजिना पुरलाय, फसवून ४ वर्षात ११ जणांची हत्या, एक चूक अन् सिरियल किलरला अटक
यकृत कुठेही मिळाले नसल्याने त्यांची बहीण माधुरी प्रशांत काळे ज्या कल्याण डोंबिवली महानगरपलिकेच्या माजी नगरसेविका आहेत यांनी धाडसी निर्णय घेत भावासाठी यकृत प्रत्यारोपणाची तयारी दर्शवली. आठवडा भरापूर्वी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. मात्र, शस्त्रक्रियेनंतरही भाबल यांची प्रकृती ढासळत गेली आणि मंगळवारी मुंबई येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

आपल्या भावाला आजारातून बाहेर काढण्यासाठी त्यांची बहीण माधुरी काळे यांनी यकृत दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी होऊनही भाबल यांना उपचारादरम्यान मृत्यूने गाठले. भाबल यांचा मनमिळावू स्वभाव होता. ते उकृष्ट धावपटू आणि क्रिकेटपटू म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने सर्वस्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आचरा पोलिस ठाण्याच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

नोकरी मिळत नसल्याने तणावात, तरुणाने जीवनयात्रा संपवली, आई-वडिलांचा एकुलता एक आधार गेला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed