• Mon. Nov 25th, 2024
    छत्रपती शिवरायांशी तुलना करण्याइतके भरत गोगावले मोठे झाले का? अंबादास दानवेंचा निशाणा

    नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाचे आणि इंग्रजांचे नाक कापायला सुरतेला गेले होते. गोगावले आणि इतर लोक नेमके कुणाचे नाक कापण्यासाठी तेथे गेले होते, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

    छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत रुबाबात सुरतेला गेले होते आणि हे सगळे लोक ज्यांनी यांना मोठे केले त्यांच्याशीच गद्दारी करुन गेले. याआधी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांचा अपमान केला होता आणि आता छत्रपती शिवाजी महाराजाचांही अपमान केला आहे. शिवाजी महाराजांबरोबर तुलना करण्याएवढे गोगावले मोठे झाले का? असाही सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

    सदावर्ते दाम्पत्याला एसटी बँक मंडळातून काढा, प्रशासक नेमा, कर्मचारी संघटनेची मागणी
    मोर्चेकऱ्यांना सामोरे जाण्यासाठी या सरकारला वेळ नाही. यांचा सगळा वेळ टक्केवारी, बदल्या आणि भ्रष्टाचारात जातो, असंही दानवे म्हणाले. अजित पवारांनी पीएचडीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांची थट्टा करू नये, अशीही टीका दानवे यांनी यावेळी बोलताना केली.

    भाऊ भाजपकडून इच्छुक, माजी महापौरांचीही लोकसभा लढवण्याची घोषणा, कोणत्या पक्षाकडून रिंगणात?
    शिंदे गटाच्या आमदारांनी कमळाच्या चिन्हावर लढण्याची इच्छा व्यक्त केली असल्याच्या मुद्द्यावर बोलताना दानवे यांनी या आमदारांना यापुढे कमळाच्या चिन्हावरच लढावे लागणार आहे, असे सांगितले. निवडणूक आयोग पक्षपाती आहे. या देशात सध्या एकाधिकारशाही आहेच. येत्या काळात हुकूमशाही आणि संरजामशाही येणार असल्याची सगळी चिन्हे आहेत.

    देशद्रोहाचा आरोप करून मांडीला मांडी लावून कसे बसू शकता? अंबादास दानवेंचा प्रश्न; फडणवीसांचं प्रत्युत्तर

    Read Latest Maharashtra Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *