इंदापुरात ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यानंतर ओबीसी आरक्षण याच्यावर एल्गार मेळाव्यानंतर धनगर नेते गोपीचंद पडळकर यांना मराठा बांधवाकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला, अशी माहिती आहे.
इंदापूरमध्ये गेल्या ४७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणा शेजारीच दुधाला दरवाढ मिळण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला भेट देण्यासाठी गोपीचंद पडळकर सभा संपल्यानंतर जात होते. या दरम्यान मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी पडळकर गो बॅक अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पडळकर यांना धक्काबुक्की करत त्यांच्या अंगावर चपला फेकल्याचा देखील प्रकार घडला आहे.
इंदापूरमध्ये ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर उपस्थित होते. इंदापूर येथील मराठा समाजाच्या सुरु असणाऱ्या आंदोलनाच्या जवळचं दूध उत्पादकांचं आंदोलन सुरु होतं त्याठिकाणी भेट देण्यासाठी गोपीचंद पडळकर गेले असता त्यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली, अशी माहिती आहे. गोपीचंद पडळकर हे अण्णा काटे यांच्या भेटीसाठी निघाले होते.
Read Latest Maharashtra News And Marathi News
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.