• Mon. Nov 25th, 2024
    पुण्यातील सहा विद्यार्थी देवगड समुद्रात बुडाले; चौघांचा अंत, एकाचा शोध सुरु, तर एक रुग्णालयात

    सिंधुदुर्ग : देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले सहा पर्यटक बुडाले असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे सहा विद्यार्थी बुडाले. सहा जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून एकावर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकाचा शोध सुरू आहे. सहा विद्यार्थांमध्ये चार मुली आणि एक मुलाचा समावेश आहे. चार मुलींचे आणि एका मुलाचा मृतदेह सापडला आहे, तर एक विद्यार्थी बुडाला असून त्याचा शोध सुरू आहे. हे सहा विद्यार्थी समुद्रात आंघोळीसाठी गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली.

    दुपारी तीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने सहाजण बुडाले. सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे, राम डिचोलकर यांचा समावेश आहे. एकाच शोध सुरू आहे. एका विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नागपुरात आढळली दीडशे जिवंत काडतुसे,पोलिसांत खळबळ, मोठा घातापाताचा कट?
    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या मागास असलेला देवगड तालुका सध्या पर्यटनाच्या माध्यमातून कात टाकताना पाहायला मिळतोय. देवगडमध्ये पवनचक्की गार्डनमुळे देवगडला एक वेगळं रुप प्राप्त झालं आहे. जिल्ह्याबाहेरुन तसंच जिल्ह्यातील अनेक पर्यटक या भागामध्ये दर दिवशी मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. त्यामुळे देवगडमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी भरु लागले आहेत. देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याकडे सुद्धा पर्यटकांचा ओघ हळूहळू वाढू लागला आहे. परंतु कोकणातील तारकर्ली, देवबाग या भागाचा पर्यटनदृष्या जेवढा विकास झाला तेवढा विकास देवगड तालुक्याचा झालेला नाही.

    मार्केटिंगमधला जॉब सोडला अन् काथ्या उत्पादनाचा निर्णय, वर्षाकाठी १० लाखांचं उत्पन्न

    मालवण, तारकर्ली, देवबाग या परिसरामध्ये अति उत्साही पर्यटकांमुळे अनेकांनी बुडून आपला जीव गमावला आहे. त्यातच आता नव्याने देवगड समुद्रकिनाऱ्याची देखील भर पडली आहे. अशा या समुद्रकिनाऱ्यांवरती सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. अशी कोणतीही उपायोजना पोलीस प्रशासनाकडून समुद्रकिनाऱ्यावर आढळून येत नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed