पुणे: देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. महायुती आणि इंडिया आघाडीसह देशभरातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडीसह मनसे देखील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. मनसे राज्यभरात २० लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. त्यात पुणे लोकसभेवर मनसेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
पुणे लोकसभेची जबाबदारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्यावर सोपवली आहे. पुणे लोकसभा प्रभारी म्हणून अमित ठाकरेंनी लक्ष केलं केंद्रीत केले आहे. त्याअनुषंघाने आज अमित ठाकरे यांनी पुण्यातील विभाग अध्यक्षांची मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत पुणे लोकसभेतील सर्वच विभाग अध्यक्ष हजर होते. पुणे शहर मनसे कार्यालयात झालेल्या या बैठकीत अमित ठाकरे यांनी विभाग अध्यक्षांची चांगलीच शाळा घेतली.

जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना पदबदल करा, असा थेट आदेशचं अमित ठाकरे यांनी दिला आहे. लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. त्यासाठी पक्ष संघटना मजबूत असणं आवश्यक असल्याचे अमित ठाकरे म्हणाले आहेत. तर राज ठाकरे पुढच्या आठवड्यात प्रभारींना सोबत घेऊन पुणे लोकसभेची आढावा बैठक घेणार आहेत. दुसरीकडे पुण्यात मनसेचा मेळावा होणार त्यासाठी मनसेच्या तयारीचा आढावा देखील अमित ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे आता मनसेने आपले लक्ष पुणे लोकसभेवर केंद्रित केले असल्याचे दिसत आहे.