• Sat. Sep 21st, 2024
अंधेरी, चेंबूर, घाटकोपर होणार चकाचक, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज स्वच्छता मोहीम

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील स्‍वच्‍छता मोहिमेंतर्गत (डीप क्लिनिंग कॅम्‍पेन) आज, शनिवारी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या उपस्थितीत परिमंडळ ३ अंधेरी के पूर्व, परिमंडळ ४ अंधेरी के पश्चिम, परिमंडळ ५ चेंबूर एम पश्चिम, परिमंडळ ६ घाटकोपर एन आणि परिमंडळ ७ कांदिवली आर दक्षिण विभाग चकाचक केला जाणार आहे. या विशेष स्वच्छता मोहिमेत मुंबईकर नागरिकांनी मोठ्या संख्‍येने सहभागी होण्‍याचे आवाहन पालिकेने केले आहे.

मुख्‍यमंत्र्यांच्‍या निर्देशानुसार, स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी पालिकेने प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर आज, शनिवारी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत विशेष स्‍वच्‍छता मोहीम राबविली जाणार आहे. त्‍यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्‍या जबाबदारीचे वाटप करण्‍यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे जुहू बीच येथील महात्मा गांधी पुतळा परिसर, इस्कॉन मंदिर येथून सकाळी ७ वाजता मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. त्यानंतर विलेपार्ले येथील नेहरू मार्ग; शहाजी राजे पालिका शाळा, सकाळी ८.३० वाजता अंधेरी पूर्व येथील गोखले उड्डाणपूल, सकाळी ९ वाजता आर दक्षिण विभागातील कांदिवली पूर्व येथील ठाकूर संकुल प्रवेशद्वार, सकाळी ९.३० वाजता एन विभागातील घाटकोपर पूर्व येथील रमाबाई नगर; राजावाडी रुग्णालय; राजावाडी उद्यान, सकाळी १०.३० वाजता एम पश्चिम विभागातील टिळक नगर येथील सह्याद्री क्रीडा मंडळ मैदान आदी ठिकाणी सहभागी होणार आहेत.

केंद्र सरकारकडून कांदानिर्यातीवर बंदी, दरवाढ रोखण्यासाठी निर्णय , कधीपर्यंत असणार बंदी? जाणून घ्या
बेवारस वाहनांची विल्हेवाट

स्वच्छता मोहिमेदरम्यान निवडलेले रस्ते, पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्याने, क्रीडांगणांची निगा, कर्मचारी वसाहतींमध्ये स्वच्छता, फेरीवालाविरहीत क्षेत्र, राडारोडामुक्त परिसर, केबल्स व वायर्स यांचे जाळे हटवणे ही कामे केली जाणार आहेत.

नाल्‍यांचीही स्वच्छता

हेडगेवार उद्यान, राजावाडी उद्यान, लायन्स उद्यान, सुभाषचंद्र बोस उद्यान, आचार्य अत्रे उद्यानातही मोहीम राबविली जाणार आहे. रमाबाई दवाखाना, कामराज नगर आपला दवाखाना, गणेश नगर दवाखाना या ठिकाणांसह लक्ष्मीबाग नाला (वाधवा रेल्वे कल्वर्ट ते रमाबाई खाडी), सोमय्या नाला (विद्याविहार स्‍थानक पूर्व ते सार्वजनिक बांधकाम विभाग परिसर) या नाल्‍यांचीही स्वच्छता केली जाणार आहे.

राज्याची चिंता वाढवणारी बातमी; ऑक्टोबर महिन्यात ८५२ बालमृत्यूंची नोंद, ‘या’ जिल्ह्यात प्रमाण अधिक

पूर्व उपनगरात येथे होणार सफाई

प्रभाग क्रमांक १२५

रमाबाई नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा

प्रभाग क्रमांक १३३

कामराज नगर, कामराज नगर पोलिस चौकी

प्रभाग क्रमांक १३२

राजावाडी रुग्णालय प्रवेशद्वार क्रमांक ४०

प्रभाग क्रमांक १३१

रसिका हॉटेल, राजाराम बने मार्ग

चार राज्याच्या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष, मुख्यमंत्री शिंदे मात्र धारावीत स्वच्छता मोहिमेत व्यस्त

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed