अमरावती : दर्यापूर-अमरावती मार्गावर एका मंगल कार्यालयानजिक चारचाकी वाहनावर मागून वाहनाने आलेल्या अज्ञातांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. गोळीबारात अंजनगाव येथील विवाहितेला गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली असून विवाहितेच्या काकाही किरकोळ करकोळ जखमी झाले आहे. तर पोलीस घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजनगाव येथील रहिवाशी रामकृष्ण सोळंके हे अमरावती येथून चारचाकी वाहन क्र. एमएच २७ डीए ८७२१ ने पत्नी, भाऊ व विवाहित मुलीसह दर्यापूरमार्गे अंजनगाव सुर्जी येथे जात होते. रात्री ८ वाजेदरम्यान मागून आलेल्या चारचाकी वाहनातून अज्ञात युवकाने चालू वाहनावर गोळीबार केला. घटनेत बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्यामुळे गाडीचे काच भेदून वाहनात मागील शिटवर बसलेल्या विवाहितेच्या कानाला गोळी छेदून गेल्याने ती गंभीर जखमी झाली.

सदर विवाहिता अमरावती येथील गाडगेनगर पोलीस स्टेशनमधून एका प्रकरणात चौकशीकरीता आली असता वडिलांसोबत परत जात होती. सदर घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून याबाबत माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी रात्रीचं दर्यापुरात दाखल होते.
सिनेस्टाईल झालेल्या या थरारामुळे रात्री वाहतूक करणाऱ्या नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. घटनेचा अंदाज आल्यानंतर सोळंके यांनी ११२ वर कॉल करून पोलिसांचे संरक्षण मागितले होते. वलगाववरून त्यांना संरक्षण मिळाले. मात्र, दर्यापूर पोलिसांची गाडी यायला उशीर झाल्याने तो मधला काळ सादर संबंधित गुन्हेगारांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.