• Sat. Sep 21st, 2024
माढा मतदारसंघावरुन भाजपात रस्सीखेच, खासदार निंबाळकरांसमोर मोहिते पाटलांचं आव्हान?

पुणे : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचे दिसते. पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच प्रत्येक मतदारसंघामध्ये व्यूहरचना आखली जात आहे. २०१९ मध्ये राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले होते. मात्र आता माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार, यावरुन भाजपमध्ये अंतर्गत कलह उफाळून येताना दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने यात आता आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे.

पुणे येथे माध्यमांसोबत बोलताना बावनकुळे म्हणाले होते की, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी ज्या पद्धतीने विकास केला आहे, ते पाहता गेल्या ५० वर्षात कुणी मतदारसंघाचा असा विकास केला नसेल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जलसिंचन, रस्ते आदी विभागात उत्तम कार्य झाले आहे. देशातील चांगले काम करणारे जे पहिले ५० खासदार असतील त्यात नाईक निंबाळकर हे निश्चितच असतील. यामुळे निंबाळकर हे त्यांच्या मतदारसंघात निश्चितच ५१ टक्क्यांच्या वर मतं मिळवून विजयी होतील, अशा शब्दात बावनकुळेंनी निंबाळकरांचं तोंडभरुन कौतुक केलं.

कोणाची जिरवायची माझ्यावर सोडा, अजितदादांच्या शिलेदाराला जवळ केलं, भाजप नेत्याला विखेंचा इशारा
उद्या जर आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवार केलं, तर माझा दावा आहे, मी संघटना पाहतो आहे, संघटना एवढी मजबूत आहे आणि त्यांचे काम एवढे जोरदार आहे, की सत्ता आणि संघटन मिळून ते ५१ टक्क्यांची लढाई लढतील. माझा दावा आहे की आजपर्यंत कुणीही घेतली नाहीत एवढी मते घेऊन त्या मतदारसंघातून ते विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शिंदेंचं मिशन ४८, मुंबईची जबाबदारी रामदास कदमांच्या लेकावर, मात्र एकाही महिलेला यादीत स्थान नाही
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात मोठी चुरस आहे. भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाला किंवा रणजितसिंह निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. परंतु या दोघांमध्ये वाढलेली अंतर्गत गटबाजी पक्षाला निवडून देण्यासाठी कितपत फायद्याची ठरेल, हे पाहणं महत्वाचं आहे.

परळीत मुंडे बहीण-भावाची एकी, पण लढत एकतर्फी नाही, शरद पवारांच्या शिलेदाराचा शड्डू
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहिते पाटलांविषयी प्रश्नावर रणजीत सिंह निंबाळकर यांचे कौतुक केलं असून त्यांच्या कामाची सुद्धा वाहवा केली आहे. त्यामुळे हा सगळा प्रश्न भाजप कशा पद्धतीने सोडवणार हे पहावं लागेल. एकेकाळी माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार सुद्धा निवडून आले होते, त्यामुळे शरद पवार यांच्याच शाळेत तयार झालेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाचा तर चालू असलेल्या खासदारकीच्या अस्तित्वाचा रणजीत नाईक निंबाळकर यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपा या ठिकाणी काय करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Read Latest Pune Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed