• Mon. Nov 25th, 2024

    साताऱ्यात नगररचनाकार आणि वैद्यकीय प्रतिनिधीचं टोकाचं पाऊल, एकाच दिवशी दोन घटना शहरात खळबळ

    साताऱ्यात नगररचनाकार आणि वैद्यकीय प्रतिनिधीचं टोकाचं पाऊल, एकाच दिवशी दोन घटना शहरात खळबळ

    सातारा : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राजेश आत्माराम उथळे (वय ५४, रा. गुरुवार पेठ सातारा) आणि वैद्यकीय प्रतिनिधी पुष्पराज राजेंद्र चौधरी (वय ४३, रा. शुक्रवार पेठ सातारा) अशी त्यांची नावे आहेत. उथळे हे जिल्हाधिकारी कार्यालयात नगररचनाकार मूल्यांकन तज्ज्ञ तर चौधरी हे वैद्यकीय प्रतिनिधी होते.

    राजेश आत्माराम उथळे यांनी सोमवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. १९९३ साली ते सहाय्यक नगररचनाकार म्हणून नोकरीला लागले होते. नंतर २०२१ मध्ये त्यांना नगररचनाकार म्हणून पदोन्नती मिळाली. सध्या ते जिल्हाधिकारी कार्यालयात नगररचनाकार मूल्यांकन तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. महाबळेश्वर, पाचगणी येथे त्यांनी काम केले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी, नातेवाईक, मित्र परिवाराने त्यांच्या घरी धाव घेतली. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
    बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडले; वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल, ताटातूट झालेल्या पिल्लाची आईजवळ घडवली भेट
    साताऱ्यातील शुक्रवार पेठेत राहणाऱ्या पुष्पराज राजेंद्र चौधरी यांनीही राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ते वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. एकाच दिवशी दोन आत्महत्यांच्या घटनांनी साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.
    पुण्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला चहासाठी हॉटेलला थांबणं १९ लाखांना पडलं, साताऱ्यात घडला धक्कादायक प्रकार
    सातारा शहर पोलीस ठाण्यात या दोन्ही आत्महत्येच्या घटनांची नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, साताऱ्यातील (सदरबझार) पुरुष भिक्षेकरीगृहात झोपेतच एकाचा मृत्यू झाला आहे. नारायण सोपय्या (वय ४५), असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
    पोहता येत नसल्याने दोन सख्ख्या भावांचा बुडून अंत, लेकरांना पाहताच माऊलीचा टाहो; अख्खं गाव हळहळलं
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed