पुणे: पुणे येथून गजानन महाराज संस्थान शेगांव येथे जाणाऱ्या भाविकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून वाकडेवाडी (शिवाजीनगर) आगारातून मंगळवार पासून स्लीपर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आगारातून मंगळवारी रात्री नऊ वाजता शेगांवसाठी पहिली स्लीपर बस सुटली.
एसटी महामंडळाकडून स्लीपर (शयनायान) बस दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत तयार केल्या जात आहेत. त्या बस तयार होतील तशा विविध आगारांना दिल्या जात आहेत. तयार झालेली एक बस शिवाजीनगर आगाराला मिळाली होती. ती बस पुणे ते शेगांव या मार्गावर सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगर आगारातून ही बस दररोज रात्री नऊ वाजता सुटणार आहे. ती बस दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता शेगाव येथे पोहचणार आहे.

यासाठी प्रत्येक प्रवाशाला ९९० एवढे तिकीट दर असणार आहे. तसेच, या बसला एसटी महामंडळाच्या सर्व सवलती लागू असतील. तसेच या बसचे आरक्षण www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर करता येईल. या बस सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजीनगर आगाराचे प्रमुख ज्ञानेश्वर रणवरे यांनी केले आहे.