• Sat. Sep 21st, 2024
मराठ्यांसाठी मुस्लीम समाजाचा मनाचा मोठेपणा; मनोज जरांगेंच्या सभेसाठी दिली कब्रस्तानची जागा

नांदेड : मनोज जरांगे पाटलांची नांदेड जिल्ह्यातील कंधारमध्ये होणाऱ्या सभेला मुस्लिम समाजाने पाठिंबा दर्शविला आहे. एवढचं नाही तर सभेला जागा कमी पडू नये म्हणून कब्रस्तानासाठी आरक्षित २० गुंठे असलेली जागा देखील देण्याचा निर्णय कंधारच्या मशीद यमना कब्रस्तान कमेटीने घेतला आहे. येत्या ८ नोव्हेंबर रोजी जरांगे पाटील यांची शिवाजी मैदान येथे ही सभा होणार आहे. मुस्लिम समाजाने घेतलेल्या या निर्णयाचे मराठा समाजाकडून स्वागत केलं जात आहे.

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी चौथ्या टप्याच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी जरांगे पाटील यांच्या पाच सभा होणार आहेत. जिल्ह्यातील पहिली सभा ७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजता मुदखेड तालुक्यातील बारड शिवारात होणार आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबर नांदेड शहरासह, लोहा तालुक्यातील मारतळा, नायगाव आणि कंधार या ठिकाणी जरांगे पाटलांची सभा होणार आहे. कंधार येथील सभा पानभोसी रोडवरील शिवाजी हायस्कूल मैदानावर होणार आहे. याच मैदानाच्या बाजूला मशीद यमना कब्रस्तान कमेटीची कब्रस्तानाची जागा आहे. ही जागा सभेसाठी देण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेऊन मुस्लिम समाजाने बंधूभाव जोपासला आहे. मराठा मोर्चा दरम्यानही मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला असल्याचं दिसत आहे.

मोदींनी आधी खिल्ली उडवली त्याच गोष्टीने भाजपला निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिलं, वाचा नेमकं काय घडलं?
नांदेडमध्ये होणार १११ एकर जागेवर सभा

नांदेड शहरातील ८ तारखेची पहिलीच सभा ही अतिशय भव्य अशी होणार असून या सभेसाठी जिजाऊनगर वाडीपाटी परिसरातील तब्बल १११ एकरचे मैदान निवडले आहे. सदरील मैदानावर नांदेड शहरासह ग्रामीण भागातील लाखो समाज बांधव या सभेला येणार असल्याचे नियोजन समितीकडून सांगण्यात आले आहे. या सभेचे नियोजन सुद्धा अतिशय शिस्तबद्ध चालू असून जवळपास १९ कमिट्या नेमण्यात आल्या आहेत. या सर्व कमिटींकडून सभेची जोरदार तयारी केली जात आहे. नांदेड शहरातील सभेला पाच लाखांहून अधिक समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक शाम पाटील वडजे यांनी दिली.

साखर कारखान्यात फोमवर पाणी मारताना पाय घसरला, उकळत्या पाण्याच्या टाकीत पडून दोन कामगारांचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed